तरुणाने महिला कॉन्स्टेबलला गुप्तांग दाखवलं, डिलिव्हरी बॉयला दाखवला इंगा

मुंबई तक

Crime News : एका तरुणाने महिलेला रस्त्यातच आपलं गुप्तांग उघडं करून दाखवलं. महिलेनं स्कूटर थांबवून त्याला पोलीस ठाण्यात नेले. हे पाहून सर्वच नागरिक थक्क झाले. महिलेनं असं का केलं असाव? असा अनेकांना प्रश्न उपस्थित झाला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

तरुणाने महिला कॉन्स्टेबलला गुप्तांग दाखवलं

point

महिलेनं ओढत पोलीस ठाण्यात ओढत नेलं

Crime News : पश्चिम बंगालच्या खरदाह येथे सोमवारी धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिथे एका तरुणाने महिलेला रस्त्यातच आपलं गुप्तांग उघडं करून दाखवलं. महिलेनं स्कूटर थांबवून त्याला पोलीस ठाण्यात नेले. हे पाहून सर्वच नागरिक थक्क झाले. महिलेनं असं का केलं असाव? असा अनेकांना प्रश्न उपस्थित झाला. संबंधित महिला ही रजेवर असणारी लेडी कॉन्स्टेबल होती, अशी माहिती समोर आली. आरोपीची ओळख आकाश घोष अशी समोर आली. तो एक डिलिव्हरी बॉय असल्याचे समोर आले. 

हे ही वाचा : पुणे: शिक्षकाकडून नववीतील मुलीचा छळ, नको तिथेच स्पर्श केल्याचा पीडितेचा आरोप

तरुणाने महिला कॉन्स्टेबलला गुप्तांग दाखवलं

जेव्हा ही घटना घडली तेव्हा महिला ही आपल्या ड्युटीच्या गणवेशात नव्हती. महिलेचा असा आरोप आहे की, त्या तरुणाने तिच्यासमोर असभ्यपणे वर्तन केले. तिने आक्षेपार्ह हावभाव केले आणि नंतर आपले गुप्तांग उघडे करून तिला दाखवले. आरोपी असभ्य वर्तन करत राहिला होता. ती महिला नेमकी कोण आहे याबाबत त्याला माहिती नव्हती. 

महिलेनं ओढत पोलीस ठाण्यात ओढत नेलं

तरुणाच्या या कृत्याने महिला कॉन्स्टेबल संतापली, तिने स्कूटर थांबवून आरोपीला जागीच पकडले. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाल्याचं चित्र निर्माण झालं. प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं असं होतं, तिने तरुणीची कॉलर पकडली आणि थेट खरदाह ठाण्यात नेले. रस्त्यावरील लोक आश्चर्याने पाहताना, हा संपूर्ण प्रकार सुमारे 400 मीटरपर्यंत सुरू राहिला. 

हे ही वाचा : रुण महिलांची अंतर्वस्त्रे चोरून परिधान करायचा, छुप्या कॅमेऱ्यात सगळंच रेकॉर्ड

स्थानिकांनी सांगितलं की, सुरूवातीला हे प्रकरण समोर आले तेव्हा कोणालाच याबाबतची माहिती नव्हती. मात्र, त्यांना जेव्हा कळालं की तरुणाने गुप्तांग दाखवून गैरवर्तन केलं, तसेच संबंधित महिला ही एक लेडी कॉन्स्टेबल आहे, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण स्पष्टपणे समोर आले. 

हे वाचलं का?