महिलेच्या पोटात आठ महिन्यांची जुळी बाळं, नवऱ्यानं बायकोचा गळा चिरून तिघांना संपवलं
Crime News : वर्षभरापूर्वी लव्ह मॅरेज झालेल्या विवाहित तरुणाने आपल्याच गर्भवती पत्नीची हत्या केली. या हत्येनंतर तिच्या पोटातील आठ महिन्यांच्या जुडव्या बाळांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वर्षापूर्वी दोघांचा कुटुंबीयांच्या संमतीने प्रेमविवाह
नवऱ्याने बायकोचा गळा चिरला अन् पोटातील बाळांचा मृत्यू
Crime News : पंजाबच्या मानसा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वर्षभरापूर्वी लव्ह मॅरेज झालेल्या विवाहित तरुणाने आपल्याच गर्भवती पत्नीची हत्या केली. या हत्येनंतर तिच्या पोटातील आठ महिन्यांच्या जुडव्या बाळांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. मृत महिलेची सिमरजीत कौर (वय 22) अशी ओळख समोर आली. तर हत्या करणाऱ्या नवऱ्याचे नाव सचप्रीत सिंह असे आहे.
हे ही वाचा : मुंबई: टिव्ही अभिनेत्याला अटक, 16 वर्षीय मुलीचा छळ केल्याचा आरोप
नेमकं काय घडलं?
आरोपीने असं हैवानी कृत्य करून घटनास्थळावरून पळ काढला होता. या घटनेची सूचना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी सर्वच पैलूंचा तपास केला होता. पोलीस आता छापेमारी करून शोध घेत आहे. दरम्यान, पोलिसांचं म्हणणं असं की, प्रकरणाचा तपास करून प्रकरणाची पुष्टी करण्यात येत आहे.
वर्षापूर्वी दोघांचा कुटुंबीयांच्या संमतीने प्रेमविवाह
सिमरजीत कौर आणि सचप्रीतचे एका वर्षापूर्वी दोघांचा कुटुंबीयांच्या संमतीने प्रेमविवाह झाला होता. कुटुंबीयांचं म्हणणं असं आहे की, पीडित मृत महिला ही आठ महिन्यांची गर्भवती होती. ती प्रसूतीसाठी माहेरी आली होती. कुटुंबीयांनी आरोप केला की, ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा तो सासरी आला आणि नंतर तिथून निघून गेला. रात्री उशिरा त्याने पीडितेला फोन केला, बाथरूमजवळ बोलावले, तिथे तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केली.
हे ही वाचा : मटनाची आस लावून बसले, पण वाढलं चिकन, भर लग्न मंडपात तुफान हाणामारी
नवऱ्याने बायकोचा गळा चिरला अन् पोटातील बाळांचा मृत्यू
पीडित महिलेच्या पोटात जुळं बाळ होतं, या हल्ल्यात आईसह त्या जुळ्या बाळांचा देखील अंत झाला. कुटुंबीयांनी आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. पोलिसांनी एका वृत्तमाध्यमाला माहिती दिली की, ही घटना संबंधित गावातील सरपंचाने दिली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्ती सुखपाल सिंहच्या विरोधात नवरा सचप्रीत सिंह विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.










