लातूर : ह्रदयरोग तज्ज्ञ मेहुल राठोड यांच्या आत्महत्येने हळहळ, गुंगीचं औषध घेतलं अन्...
cardiologist dr mehul rathod suicide case : लातूरमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी गुंगीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून पोलिस तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लातूर : ह्रदयरोग तज्ज्ञ मेहुल राठोड यांच्या आत्महत्येने हळहळ
गुंगीचं औषध घेतलं अन्...
cardiologist dr mehul rathod suicide case : लातूर शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध एम.जे. हॉस्पिटलचे संचालक आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या चारचाकी वाहनात आढळून आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून डॉक्टरांच्या निधनाची बातमी समोर येताच नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी गुंगीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : प्रियकराच्या भावाने अमृताला संपवलं, चारी-बाजूंनी घात झाला, निष्पाप विद्यार्थीनीचा जीव गेला
कारमध्ये आढळला डॉ. मेहुल राठोड यांचा मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरहून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या महामार्गालगत त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मृतदेह आढळल्यानंतर संबंधित यंत्रणांना याची माहिती देण्यात आली. प्राथमिक तपासात गुंगीचे इंजेक्शन घेतल्यामुळे आत्महत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास करत आहेत.
हेही वाचा : खरंच बुलेट ट्रेनसाठी बांधलेला उल्हास नदीवरील पूल कोसळला का? शासनाचे स्पष्टीकरण










