खरंच बुलेट ट्रेनसाठी बांधलेला उल्हास नदीवरील पूल कोसळला का? शासनाचे स्पष्टीकरण

मुंबई तक

ulhas river bullet train temporary bridge viral claim fact check : उल्हास नदीवरील बुलेट ट्रेनचा पूल वाहून गेल्याचा सोशल मीडियावरील दावा चुकीचा असल्याचे DGIPR ने स्पष्ट केले. व्हायरल व्हिडिओतील संरचना ही कायमस्वरूपी पूल नसून तात्पुरता बांधकाम पूल असल्याचे सांगण्यात आले.

ADVERTISEMENT

ulhas river bullet train temporary bridge viral claim fact check
ulhas river bullet train temporary bridge viral claim fact check
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बुलेट ट्रेनसाठी बांधलेला उल्हास नदीवरील पूल कोसळल्याचा दावा

point

हा दावा दिशाभूल करणारा; शासनाचे स्पष्टीकरण

ulhas river bullet train temporary bridge viral claim fact check : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उल्हास नदीवरील पूल वाहून गेल्याचा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) स्पष्ट केले आहे. DGIPR च्या फॅक्ट चेकमध्ये व्हायरल व्हिडिओतील संरचना ही बुलेट ट्रेनचा कायमस्वरूपी पूल नसून प्रकल्पाच्या कामासाठी उभारण्यात आलेला तात्पुरता बांधकाम पूल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा मुख्य पूल वाहून गेला असल्याचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या कंपनीवर FDA ची मोठी कारवाई

वाहून गेलेला पूल कायमस्वरूपी बुलेट ट्रेनच्या रेल्वे पुलाचा भाग नव्हता

DGIPR ने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी संरचना ही बांधकामासाठी लागणारे साहित्य, यंत्रसामग्री आणि कामगारांची वाहतूक करण्यासाठी उभारण्यात आलेला तात्पुरता प्रवेश पूल होता. हा पूल ठाण्यातील दिवा परिसरात उल्हास नदीवर उभारण्यात आला होता. 4 ते 6 जुलैदरम्यान मुंबई महानगर प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा तात्पुरता बांधकाम पूल वाहून गेला. मात्र हा पूल कायमस्वरूपी बुलेट ट्रेनच्या रेल्वे पुलाचा भाग नव्हता. कायमस्वरूपी पुलाचे बांधकाम अद्याप सुरू असून त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : ये रे ये रे पावसा.., ऐन जुलै महिन्यात पाऊस गेला कुठे? 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट

हे वाचलं का?