Maharashtra Weather : ये रे ये रे पावसा.., ऐन जुलै महिन्यात पाऊस गेला कुठे? 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. अशातच जाणून घ्या 16 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात काही दिवसांपासून पावसाची दांडी

point

16 जुलै 2026 रोजी राज्यातील हवामान विभाग

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपूर्वी पावसाने हाहाकार माजवला होता. अशातच आता पावसाने गैरहजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांना हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. अशातच जाणून घ्या 16 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट: सरकारची कारवाई, शाळांबाहेर कॅफीनयुक्त ड्रिंक्सची विक्री सुरूच

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई या तीन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरीत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. नाशिकमध्ये हलक्या पावसासह मेघगर्जनेची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस, विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर शहरात पावसाचा यलो अलर्ट आहे. पुणे घाटमाथा परिसरात हलक्या पावसासह मेघगर्जनेची शक्यता आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात मध्यम पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये हलका पाऊस असण्याची शक्यता वर्तवलेली आहे. 

हे वाचलं का?