पुण्याची गोष्ट: सरकारची कारवाई, शाळांबाहेर कॅफीनयुक्त ड्रिंक्सची विक्री सुरूच

मुंबई तक

Pune News : शाळांच्या आवारात कॅफीनयुक्त एनर्जी ड्रिंकची विक्री सुरू असलेली पाहायला मिळते. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरील परिणामांबाबत चिंता वाढू लागलेली आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने असे प्येय शाळा - कॉलेजच्या परिसरात न विकण्याबाबत कारवाई केली होती. मात्र, पुण्यात असे कॅफीनयुक्त प्येय उघडपणे विकले जात आहेत, यामुळे लहान मुलांच्या आरोग्याबाबतचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. 

ADVERTISEMENT

AI Generated Photo
Pune News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुण्यात शाळेच्या परिसरात कॅफीनयुक्त प्येयाची विक्री 

point

मुलांच्या आरोग्याबाबतचा प्रश्न ऐरणीवर

पुण्याची गोष्ट : शाळांच्या आवारात कॅफीनयुक्त एनर्जी ड्रिंकची विक्री सुरू असलेली पाहायला मिळते. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरील परिणामांबाबत चिंता वाढू लागलेली आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने असे प्येय शाळा - कॉलेजच्या परिसरात न विकण्याबाबत कारवाई केली होती. मात्र, पुण्यात असे कॅफीनयुक्त प्येय उघडपणे विकले जात आहेत, यामुळे लहान मुलांच्या आरोग्याबाबतचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा : मरावतीत मुलीवरून वाद, धारदार शस्त्राने हाताचा पंजा सेपरेट करत संपवलं

पुण्यात शाळेच्या परिसरात कॅफीनयुक्त प्येयाची विक्री 

अलीकडेच पुण्यातील एरंडवणे, लॉ कॉलेज, पोड रोड, कर्वे रोड, भारती विद्यापीठ, नळ स्टॉप आणि टिळक रोड परिसरातील शाळेच्या बाहेरील टपरी-दुकानांमध्ये विक्री सुरू असल्याचे आढळून येते.  मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत शाळेच्या आवारात कॅफीनयुक्त प्येय विकणाऱ्या विक्रेत्यांबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. 

कॅफीनयुक्त प्येयाने डोकेदुखी, चिडचिड आणि थकवा निर्माण होण्याची शक्यता

या कॅफीनयुक्त प्येयाच्या सततच्या सेवनाने कॅफीनचे सवय जडते. यामुळे डोकेदुखी, चिडचिड आणि थकवा निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते याच सेवनाने लहान मुलांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मूत्रपिंडाचे कार्य आणि शारीरिक आणि मानसिक तणाव निर्माण होऊन विकासावर देखी विपरीत परिणाम होतो. 

हे ही वाचा : Devendra Fadanvis : '48 हजार कोटी रूपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे बिल माफ', मुख्यमंत्र्यांची घोषणा

बहुतेक कॅफीनयुक्त असलेल्या प्येयाच्या बाटलीवर लहान मुले, गरोदर महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी सेवन करू नये. कारण याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शाळकरी मुलांच्या या कॅफीनयुक्त कोल्ड्रिंक्सच्या सेवनाने चिंता निर्माण झाली आहे. 

हे वाचलं का?