Devendra Fadanvis : '48 हजार कोटी रूपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे बिल माफ', मुख्यमंत्र्यांची घोषणा
Devendra Fadanvis : 'साडे सात हजार पर्यंतच हॉस्पवारच बिल जे थकीत आहे ते 48 हजार कोटी रूपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे बिल माफ करणार', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यातील बळिराजा मोठा दिलासा देत ऐतिहासिक योजनेची घोषणा केली. यानंतर आज 15 जुलै 2026 रोजी मुंबईत किसान मोर्च्याच्या वतीने विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
'48 हजार कोटी रूपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे बिल माफ'
Devendra Fadanvis : 'साडे सात हजार पर्यंत हॉस्पवारील थकीत बिल ते 48 हजार कोटी रूपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे बिल माफ करणार', अशी देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. या घोषणेनं राज्यातील बळिराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. आज 15 जुलै 2026 रोजी मुंबईत किसान मोर्च्याच्या वतीने विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेमुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं.
हे ही वाचा : मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला भीषण आग, Video व्हायरल
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्र्यांच्या सत्कार समारंभ सोहळ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत मोठी घोषणा केली आहे. 'साडे सात हजार पर्यंतच हॉस्पवारचं बिल जे थकीत आहे ते 48 हजार कोटी रूपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे बिल माफ करणार', अशी घोषणा केली. या घोषणेनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एवढंच नसून शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण वेळ शेतीसाठी वीज मिळणार आहे, यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
गावातील शेतीची करून दिली आठवण
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. उपस्थित शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या गावातील शेतीबाबत सांगितलं की, 'आमच्या गावी देखील वडिलोपार्जित शेती आहे. गावात गेला तर तिथे तुम्हाला धनाची शेती केलेली आढळून येईल. मी वर्षातील तीन महिने गावात असायचो. माझे वडील हे शेतकरीच होते, त्यामुळे मला हे सर्व माहिती आहे. आमच्याकडे बगीचा होता, त्यात सर्व प्रकारच्या भाज्या लावल्या जात होत्या.'
हे ही वाचा : भाजपसोबत गेल्यावर अर्थमंत्रीपद मिळणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
'मी शेतात गेलेलो आहे, शेती बघितलेली आहे. मी हे सर्व लहानपणापासून पाहत आलेलो आहे, त्यामुळे एका रुममध्ये बसून निर्णय घेणारा मी नाहीये,' असं म्हणत त्यांनी राजकीय नेत्याचं नाव न घेता मिश्कील टोला लगावला.










