डिलिमिटेशनला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा? सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

मुंबई तक

राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपप्रणित एनडीए आघाडीत जाणार असल्याच्या शक्यता खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळल्या आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी डिलिमिटेशन बिलाविषयी देखील भाष्य केले.

ADVERTISEMENT

Supriya Sule On Delimitation
Supriya Sule On Delimitation
Google CTA

बातम्या हायलाइट

point

डिलिमिटेशन बिलाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा?

point

सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

Supriya Sule On Delimitation : राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपप्रणित एनडीए आघाडीत जाणार असल्याच्या शक्यता खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळल्या आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी डिलिमिटेशन बिलविषयी देखील भाष्य केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार या बिलाला संसदेत पाठिंबा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. याविषयी सुप्रिया सुळे काय म्हणाल्या, जाणून घेऊया.

बिल आल्याशिवाय काय बोलणार?

डिलिमिटेशन बिलविषयी राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका मांडताना सुळे म्हणाल्या की, ' एकतर नवीन बिल आलेलं नाहीये आमच्याकडे. त्यामुळे नवीन बिल आल्याशिवाय बिलबद्दल मी काय बोलणार? हे बिल आल्यावर चोवीस तासात त्याचा अभ्यास करुन आमची काय भूमिका आहे ते मी सांगू शकते. मात्र तुम्हाला मी थोडंसं इतिहासात नेते. इतिहास या बिलाचा असा आहे की, एकतर महिला आरक्षणाचं बिल हे एकमतानं भारताच्या संसदेत  पास झालेलं आहे. त्यानंतर किरन रिजिजू यांनी मला, अरविंद सावंत आणि असदुद्दीन ओवेसी यांना भेटायला बोलावलं. त्या मीटिंगमध्ये गृहमंत्री अमितभाई शहा हेदेखील होते. त्यावेळी रिजीजू यांनी आम्हाला असं ब्रिफिंग केलं की, आमचं सपा, काँग्रेस, डीएमके यांच्याशी वेगळं-वेगळं बोलणं झालंय. आम्ही तुम्हा तिघांना एकत्र बोलवलंय. आमच्या मनात एक प्रस्ताव आहे. डिलिमिटेशन बद्दल वेगवेगळी मतं आहेत. दक्षिणेतल्या राज्यांना असं वाटतंय की जर लोकसंख्येवर आधारित डिलिमिटेशन झालं तर दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होईल. त्यामुळे डिलिमिटेशनला सगळ्यांचा विरोध आहे. सगळ्यांना समान न्याय मिळावा. हे पूर्णपणे रास्त आहे. हे आम्हाला सगळ्यांनाच मान्य आहे.  

हे ही वाचा : मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला भीषण आग, Video व्हायरल

पन्नास टक्क्यांची अट काय?

यापुढं बोलताना त्या म्हणाल्या की, 'आता डिलिमिटेशनचा फॉर्म्युला बदलता येईल का? अमितभाई शहा आणि रिजिजू यांनी एक प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला की आपण सरसकट कश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येक राज्यात पन्नास टक्के सीट वाढतील. याचं उदाहरण मी सांगते. समजा 48 सीट महाराष्ट्रात आहेत. 48 चं पन्नास टक्के किती होतं? चोवीस. म्हणजे 48 अधिक 24 म्हणजे 72. म्हणजे महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जातील. उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार निवडून जातात. त्याचं पन्नास टक्के म्हणजे चाळीस. म्हणजे उत्तर प्रदेशातून 120 खासदार जातील. आपण महाराष्ट्राविषयी बोलूया. 72 खासदारांमध्ये पहिलं एससी, एसटीला आरक्षण द्यायचं. त्या तीन सीट्स जातात हिशोबाप्रमाणे. 69 राहिल्या. 69 मधल्या 33 टक्के आरक्षण जाणार, महिलांना जाणार. राहिल्या 48 ज्या ओपनला राहतील.'

'जर पन्नास टक्के देशात सरसकट वाढ आली तर कोणाचा विरोध आहे का? तेव्हा आम्ही सगळ्यांनी सांगितलं की लोकसंख्येपेक्षा हे योग्य वाटतंय. आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो. मी स्वत: इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये गेले. आमचं ऑब्जेक्शन होतं की आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवा. तुम्ही सपाला, तृणमूलला, काँग्रेसला, वेगळंवेगळं बोलावू नका. जर चांगला प्रस्ताव असेल मनात काही दुसरं नसेल तर आम्हाला एकत्र का बोलवत नाहीत? म्हणून खर्गे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही सरकारला पत्र लिहिलं. हा प्रस्ताव आम्हाला बरा वाटतोय. डिलिमिटेशनचं बिल यावर्षी ड्यू आहे.'

हे वाचलं का?