'पैसाच नाहीये...' कुबेरांनी सांगितले महाराष्ट्रासमोरचे आर्थिक धोके!
Mumbai Tak Baithak :मुंबई तकच्या बैठक कार्यक्रमात ज्येष्ठ संपादकांनी महाराष्ट्रातील बदलते राजकारण, लोकानुनयी योजना आणि राज्याच्या अर्थकारणावर परखड भाष्य केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'पैसाच नाहीये...' कुबेरांनी सांगितले महाराष्ट्रासमोरचे आर्थिक धोके!
Mumbai Tak Baithak : मुंबई तकच्या बैठक कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक राजदीप सरदेसाई, मिलिंद खांडेकर, गिरीश कुबेर आणि साहिल जोशी यांनी सहभाग घेत महाराष्ट्रासह देशातील बदलत्या राजकारणावर सविस्तर संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील बदलत चाललेले राजकारण, राजकारणातील नैतिकता, लोकांची मानसिकता आणि निवडणुकांमधील बदलती समीकरणे या विषयांवर चारही संपादकांनी परखड भूमिका मांडली. चर्चेदरम्यान आजच्या राजकीय वातावरणात लोकानुनयी योजनांचे वाढते महत्त्व, निवडणुका जिंकण्याचे बदलते मार्ग आणि त्याचा राज्याच्या अर्थकारणावर होणारा परिणाम यावरही सखोल चर्चा झाली.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत पावसाची हजेरी लागणार, हवामान विभागाची अपडेट
गिरीश कुबेर यांनी बोलतानाआज निवडणुका जिंकण्यासाठी लोकानुनयी योजनांचा वापर हा एक प्रकारचा 'टूलकिट' बनल्याचे त्यांनी नमूद केले. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील निकालांमध्ये अवघ्या चार महिन्यांत झालेल्या बदलांचाही त्यांनी उल्लेख केला. मात्र महाराष्ट्राकडे केवळ नकारात्मक दृष्टीने पाहणे योग्य नसल्याचे सांगत, रोजगार हमी योजना, शिक्षणाचा हक्क, महिलांच्या हक्कांबाबतचे निर्णय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला आरक्षण तसेच चित्रपट नगरीसारख्या अनेक महत्त्वाच्या संकल्पना महाराष्ट्रातूनच पुढे आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
हेही वाचा : जालना : बस थांबवली, मुलीला खाली उतरवलं, पुढे चालकाला मारहाण.. तरुणाने पुढे काय केलं?










