राज्यात काही दिवस मान्सूनचा 'या' जिल्ह्यांना ऑरेंज, रेड अलर्ट

मुंबई तक

Maharashtra weather : अनेक भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा परिसर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत जोराचा पाऊस राहील, अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.

ADVERTISEMENT

Google CTA

राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला दिसून येत आहे, सध्या ढगाळ वातावरण दिसतंय. पुढील काही दिवस राज्यात मान्सून दाखल होणार आहे. अनेक भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा परिसर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत जोराचा पाऊस राहील. 

काही जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंजचा अलर्ट जारी केला आहे, तसेच काही भागांना यलो उलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे. शिवाय जुलै महिन्याच्या सुरूवातीला मान्सूनचा जोर कायम राहणार आहे. नागरिकांना नदीकाठी, डोंगराळ भाग आणि समुद्रकिनारी फिरण्यास जाणे टाळावे. या पावसाचा मुंबई, ठाणे शहरांत मोठ्या दैनंदिन जीवनावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्टची शक्यता आहे.