हॉटेलच्या खोलीत 22 वर्षीय मेकअप आर्टिस्टवर अत्याचार, रक्तस्त्राव अन् रक्तरंजित थरार

मुंबई तक

Crime News : हॉटेलमध्ये 22 वर्षीय मेकअप आर्टीस्टवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पीडित तरुणीची परिस्थिती गंभीर असून तिला एका रुग्णालयात भरती करण्यात आले. पीडितेनं इंस्टाग्रामवरून तरुणासोबत मैत्री केली होती. त्याच तरुणाने मैत्रीचा गैरफायदा घेत तिला कोल्ड ड्रिंक पाजून बेशुद्ध केले आणि अत्याचार केल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

यास्मिन आणि साहिब हॉटेलच्या खोलीत 

point

जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार

Crime News : दिल्लीच्या मुखर्जीनगर येथील हॉटेलमध्ये 22 वर्षीय मेकअप आर्टीस्टवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पीडित तरुणीची परिस्थिती गंभीर असून तिला एका रुग्णालयात भरती करण्यात आले. पीडितेनं इंस्टाग्रामवरून तरुणासोबत मैत्री केली होती. त्याच तरुणाने मैत्रीचा गैरफायदा घेत तिला कोल्ड ड्रिंक पाजून बेशुद्ध केले आणि अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीच्या आधारावर एफआरआय दाखल करत पुढील तपास केला. 

हे ही वाचा : बायको बॉयफ्रेंडसोबत मोमोज खात होती, नवऱ्यानं पकडलं अन् भररस्त्यात राडा

घडलेल्या घटनेनुसार, पीडित कपुणी यास्मीन कुटुंबासह वजीराबाद परिसरातील रहिवासी होती. पीडितेच्या वडिलांनी तब्येतीत बिघाड झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी तिनं मेकअप आर्टिस्टचं काम सुरू केलं. यास्मिनने सांगितलं की, इंस्टाग्रामवर मेकअपचे तंत्र शिकवणारे रिल्स अपलोड करते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तिची इंस्टाग्राम साहिब नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली. साहिबनेही स्वत:ची ओळख मेकअप आर्टिस्ट म्हणून करून दिली नंतर ते फोनवर बोलू लागले. 

यास्मिन आणि साहिब हॉटेलच्या खोलीत 

पुढे यास्मिनने सांगितलं की, या वर्षी साहिब तिला भेटण्यासाठी आग्रह धरू लागला होता. जुलै महिन्यात साहिब आणि यास्मिन मुखर्जीनगरमधील एका हॉटेलमध्ये येऊन राहिले. तेव्हा साहिबने औषध मिसळलेले शीतप्येय देऊन यास्मिनला बेशुद्ध केले. आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. मुलीला शुद्ध आली असता, तिने विरोध केला. नंतर आरोपीने तिच्याशी विवाह करण्याचे वचन देऊन पोलिसांकडे तक्रार न करण्याची समजून काढली. 

जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार

पीडितेनं सांगितलं की, आरोपी 8 ऑगस्ट रोजी पुन्हा बुराडी बायपासवर आला. तेव्हा त्याच्यासोबत आणखी एक तरुण होता. साहेब तिला जीटीबी नगरमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेदरम्यान पीडितेची प्रकृती अधिकच खालावली होती. पीडितेचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.