बायको बॉयफ्रेंडसोबत मोमोज खात होती, नवऱ्यानं पकडलं अन् भररस्त्यात राडा

मुंबई तक

Extra Marrital Affair : नाईट शिफ्टचे निमित्त आणि रस्त्याच्या कडेला असलेला मोमोचा एक स्टॉलवर एक महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत मोमो खात होती. इतक्यात महिलेच्या नवऱ्याने तिला बॉयफ्रेंडसोबत पाहिलं असता, त्यांच्या नातेसंबंधाबाबतचं भांडाफोड झालं. त्यानंतर त्या दोघांच्या नातेसंबंध आणि वैवाहिक जीवनाला अचानकपणे मोठं वळण प्राप्त झालं. 

ADVERTISEMENT

Extra marrital affair (AI)
Extra marrital affair
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत मोमोज खाताना नवऱ्यानं पाहिलं

point

नवऱ्याचा संयम तुटला

Extra Marrital Affair : उत्तर प्रदेशातील भोपाळ येथून मन विचित्र प्रकार उघडकीस आलाय. नाईट शिफ्टचे निमित्त आणि रस्त्याच्या कडेला असलेला मोमोचा एक स्टॉलवर एक महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत मोमो खात होती. इतक्यात महिलेच्या नवऱ्याने तिला बॉयफ्रेंडसोबत पाहिलं असता, त्यांच्या नातेसंबंधाबाबतचं भांडाफोड झालं. त्यानंतर त्या दोघांच्या नातेसंबंध आणि वैवाहिक जीवनाला अचानकपणे मोठं वळण प्राप्त झालं. 

हे ही वाचा : Astrology : सिंह राशीतील सूर्याचे महापारगमन, 'या' राशींनी सावधगिरी बाळगावी

पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत मोमोज खाताना नवऱ्यानं पाहिलं

पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत मोमोज खाताना पाहून पतीने संताप अनावर झाला. त्यामुळे संबंधित परिसरात संताप पसरला असून एकच गोंधळ उडाला. ही घटना भोपाळच्या अशोक गार्डनर पोलीस पोलीस ठाणे हद्दीतील आहे. घडलेल्या घटनेनुसार, पती नेहमीप्रमाणे रात्रीच्या पाळीसाठी घरातून निघाला होता. त्याचदरम्यान वाटेत भूक लागल्याने तो मोमोज स्टॉलपाशी पोहोचला आणि त्याला आपली पत्नी तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसली, हा प्रकार पाहून नवरा संतापला. 

नवऱ्याचा संयम तुटला

नवऱ्याने जेव्हा पत्नीला तिसऱ्या पुरूषासोबत क्वालीटी टाईम घालवताना पाहिले असता, त्याचा संयम तुटला होता. नंतर तो तात्काळपणे स्टॉलजवळ गेला आणि त्याने आपल्या पत्नीला याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर प्रकरण अधिकच चिघळले आणि नंतर त्यांच्यात जोरदार वाद निर्माण झाला होता. इतक्यात एकाने हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. 

हे ही वाचा : जवान सुट्टीवर आला अन् सोन्यासारख्या बायकोला संपवले, नेमकं कारण काय?

संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आले. अशातच डीसीपी सुनील शर्मा यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पती-पत्नीपैकी कोणीही संबंधित प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नसल्याचं सांगितलं.