Govt Jobs : दहावी उत्तीर्णांना सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी, 60 हजारांहून अधिक पगार

सर्वोच्च न्यायालयात ज्युनियर कोर्ट अटेंडंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर आहे.

ADVERTISEMENT

Supreme Court Recruitment 2026
Supreme Court Recruitment 2026
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

point

कसा कराल अर्ज?

Supreme Court Recruitment 2026 : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) ज्युनियर कोर्ट अटेंडंट या ग्रुप 'सी' पदांसाठी भरती जाहीर केली आहे. याअंतर्गत एकूण 130 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 25 नोव्हेंबर 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही किमान 10 वी उत्तीर्ण आणि कमाल 12 वी उत्तीर्ण अशी असावी. अर्जदारांचे वय 1 ऑक्टोबर 2026 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 27 वर्षे असावे, तसेच आरक्षित वर्ग आणि इतर सवलतींच्या उमेदवारांसाठी नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल. 

हे ही वाचा : 'अश्विनी भिडेंना पगार देऊ नका...', सुप्रीम कोर्टाने का दिला एवढा कठोर निर्णय.. नेमकं घडलं तरी काय?

'अशी' होणार परीक्षा

परीक्षा शुल्क म्हणून सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1,500 आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग (OBC), माजी सैनिक व दिव्यांग उमेदवारांसाठी 750 रुपये निश्चित करण्यात आले आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी आणि मुलाखत या दोन टप्प्यांत पार पडेल. लेखी परीक्षेत एकूण 100 प्रश्नांसाठी 100 गुण असणार आहेत. या परीक्षेसाठी दीड तासाचा वेळ दिला जाईल, तर मुलाखत 25 गुणांची असेल. या भरतीची लेखी परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे.

हे ही वाचा : 'राज्यात 72 पेक्षा भयानक दुष्काळ...' राज ठाकरेंचा मोठा निर्णय, दिवाळी साजरी करण्याबाबत काय सांगितलं?

पगार किती मिळणार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 21,700 ते 69,100 रुपये इतके वेतन मिळणार आहे. तसेच इतर सरकारी भत्ते देखील दिले जाणार आहे. नोकरीचे ठिकाण दिल्ली असणार आहे. या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 25 नोव्हेंबर 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसंदर्भातील अधिक माहिती, सविस्तर जाहिरात आणि ऑनलाइन अर्जाची लिंक सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.sci.gov.in) उपलब्ध आहे.