कल्याण-उल्हासनगरकरांना दिवाळीत सरकारकडून खास भेट, घेतला प्रचंड मोठा निर्णय!

कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथकरांसाठी मेट्रोबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. MMRDA ने मेट्रो-5 आणि मेट्रो-5A च्या पुढील टप्प्यांसाठी 4,564 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.

ADVERTISEMENT

kalyan bhiwandi ulhasnagar ambernath metro line 5 5a rs 4564 cror tenders diwali gift
कल्याण उल्हासनगर मेट्रोबाबत मोठा निर्णय
Google CTA

कल्याण: कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथकरांसाठी यंदाची दिवाळी मेट्रोची भेट घेऊन आली आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका 5 आणि मेट्रो मार्गिका 5A च्या पुढील टप्प्यांच्या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA)तब्बल 4 हजार 564 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या पुढील कामांना गती मिळणार आहे.

उल्हासनगरमधील मेट्रो स्थानकाला 'सिंधूनगर' नाव देण्याची मागणी

या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी उल्हासनगरमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर अॅड. अश्विनी निकम, सभागृह नेते अरुण अशान, राजेंद्र चौधरी, भुल्लर महाराज यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उल्हासनगरमध्ये या मेट्रो प्रकल्पांतर्गत तीन स्थानके उभारली जाणार असून, त्यापैकी एका स्थानकाला ‘सिंधूनगर’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी उल्हासनगरमधील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

हे ही वाचा>> 'अश्विनी भिडेंना पगार देऊ नका...', सुप्रीम कोर्टाने का दिला एवढा कठोर निर्णय.. नेमकं घडलं तरी काय?

श्रीकांत शिंदे यांचा प्रकल्पासाठी पाठपुरावा

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन मार्गातील बदल, प्रशासकीय मान्यता आणि प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.

हे ही वाचा>> Govt Jobs : ONGC मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु, कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड...; लगेच करा अर्ज

मेट्रो-5 चा मार्ग कुठून कुठपर्यंत असणार?

मेट्रो-5 अंतर्गत धामणकर नाका ते रांजणोली आणि पुढे दुर्गाडीमार्गे भोईरवाडीपर्यंत मेट्रोचा विस्तार होणार आहे. भिवंडीतील अरुंद रस्त्यांमुळे धामणकर नाका ते टेमघरपर्यंत मेट्रो भुयारी, तर उर्वरित मार्ग उन्नत स्वरूपात उभारण्याचे नियोजन आहे. मेट्रो-5A अंतर्गत भोईरवाडी ते कल्याण रेल्वे स्थानक आणि भोईरवाडी ते उल्हासनगरमार्गे अंबरनाथमधील जीएनपी गॅलेक्सीपर्यंत मेट्रो कनेक्टिव्हिटी प्रस्तावित आहे.

डबल डेकर मेट्रो मार्गिकेचेही नियोजन

या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रांजणोली ते दुर्गाडी परिसरात डबल डेकर मार्गिका उभारण्याचे नियोजन आहे. कोनगाव येथून कल्याण एपीएमसीकडे तसेच भोईरवाडीमार्गे उल्हासनगरपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याची योजना आहे. उल्हासनगरमधील जगदीश दूध डेपो परिसरापासून पुढे डबल डेकर मार्गिकाही उभारली जाणार आहे. या मेट्रोमुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरांमधील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना जलद आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे 4,564 कोटींच्या या प्रकल्पाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.