नागपूर: पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल
Nagpur Suicide : नागपूरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी ज्ञानेश्वर झोळ अशी ओळख समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलीस अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
कुटुंबाला मोठा धक्का
Nagpur Suicide : नागपूरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीची सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी ज्ञानेश्वर झोळ अशी ओळख समोर आली आहे. ते नागपूर येथील पोलीस आयुक्त कार्यालयातील पीआरओ आणि अर्ज शाखेत कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येमुळे नागपूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : हॉटेलच्या खोलीत 22 वर्षीय मेकअप आर्टिस्टवर अत्याचार, रक्तस्त्राव अन् रक्तरंजित थरार
संबंधित आत्महत्येची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह पुढे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. अशातच प्राथमिक अंदाजानुसार, कौटुंबिक कारण असल्याची माहिती सांगितली जातेय. मात्र आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप समोर आले नाही.
पोलीस अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर झोळ यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास रात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास पीसीएमटी क्वार्टर्समध्ये जीवन संपवल्याची घटना आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने नागपूर पोलीस दलात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. या आत्महत्येमागील नेमकं ठोस कारण समोर आले नाही. संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा : बायको बॉयफ्रेंडसोबत मोमोज खात होती, नवऱ्यानं पकडलं अन् भररस्त्यात राडा
पोलिसांनी तपास करताना घटनास्थळावर सुसाईड नोट किंवा इतर काही महत्त्वाचे पुरावे आढळून आले नाही. या प्रकरणी पोलीस कुटुंबीयांकडून अधिकची माहिती घेत आहेत. ते मानसिक तणावात होते का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र याची अद्यापही एकूण माहिती समोर आली नाही. ज्ञानेश्वर झोळ यांच्या या टोकाच्या पाऊलाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
