जेजुरीत टेम्पोची वारकऱ्यांना धडक, तिघांचा मृत्यू; 3 जण जखमी
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ टेम्पोने वारकऱ्यांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा वारकरी जखमी झाले असून, त्यापैकी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जेजुरीत टेम्पोची वारकऱ्यांना धडक
तिघांचा मृत्यू; 3 जण जखमी
Jejuri Warkari Accident : पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळ टेम्पोने वारकऱ्यांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सहा वारकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यापैकी तीन वारकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वारकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा : ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत अडचणीत, सुनेचे गंभीर आरोप, गुन्हा दाखल
जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू
या अपघातातील जखमींपैकी तिघा वारकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांची नावेही समजू शकलेली नाहीत. उर्वरित जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती लक्षात घेऊन वैद्यकीय उपचार केले जात आहेत. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत पावसाची हजेरी लागणार, हवामान विभागाची अपडेट










