Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत पावसाची हजेरी लागणार, हवामान विभागाची अपडेट

मुंबई तक

Maharashtra weather : राज्यात गेली तीन दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. ऐन जुलै महिन्यात अशी स्थिती का निर्माण झाली असावी? असा प्रश्न उपस्थित होतोय, अशाच स्थितीत जाणून घ्या 13 जुलै रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather ( AI Generated Photo)
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात गेली तीन दिवसांपासून पावसाची दांडी

point

13 जुलै रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या

Maharashtra Weather : राज्यात गेली तीन दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. सर्वच विभागांमध्ये कोरडं हवामान आहे, तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऐन जुलै महिन्यात अशी स्थिती का निर्माण झाली असावी? असा प्रश्न उपस्थित होतोय, अशाच स्थितीत जाणून घ्या 13 जुलै रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे ही वाचा : ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत अडचणीत, सुनेचे गंभीर आरोप, गुन्हा दाखल

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हलक्या पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.  सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांत कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. 

हे वाचलं का?