Maharashtra Weather : दिवाळीच्या तोंडावर हवामान बदललं, राज्यावर दुहेरी संकट
Maharashtra Weather : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पावसाची स्थिती ही अनुकूल असणार आहे. यामुळे आता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविलेला नाही, अशातच जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात नोव्हेंबर महिन्यात हवामानात सातत्याने बदल
दिवाळीच्या तोंडावर हवामान बदललं
Maharashtra Weather : राज्यात नोव्हेंबर महिन्यात हवामानात सातत्याने बदल होताना दिसतो. 8 नोव्हेंबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा अलर्ट वर्तवलेला नाही. तसेच राज्यातील काही भागात पावसाचा इशारा नसल्याने संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तर रात्री हवेत थोडासा गारवा जाणवण्याची शक्यता आहे, अशातच जाणून घेऊयात 8 नोव्हेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
हे ही वाचा : राणा जगजितसिंह पाटील यांची शरद पवारांशी भेट, सुनेत्रा पवारांच्या पाठीशी माहेरचे कुटुंब उभे?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पावसाची स्थिती ही अनुकूल असणार आहे. यामुळे आता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविलेला नाही
कोकण
कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तविलेला नाही. समुद्रकिनारपट्टीच्या भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत पावसाचा इशारा नाही. या सर्वच जिल्ह्यांत कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे, मात्र रात्री हवेत गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात बीड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत पावसाचा कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही. मराठवाडा विभागात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे ही वाचा : चर्चगेट विरार फास्ट लोकलमध्ये तुफान हाणामारी, चालत्या लोकलमधून प्रवासी फेकला
विदर्भ
नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.
