47 वर्षीय व्यक्तीची मित्राच्या 20 वर्षीय मुलीकडे 'ती' मागणी, तरुणीनं नकार देताच भयंकर घडलं

Crime News : एका 47 वर्षीय व्यक्तीचे आपल्या 20 वर्षाय मुलीसोबत विवाह करणार होता. तरुणीने विवाहास नकार दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने पेट्रोलची बाटली घेतली आणि तो फॅक्टरीत गेला होता. लग्नाला विरोध मिळाल्याने त्या व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतलं.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

47 वर्षीय व्यक्तीचे मित्राच्याच मुलीवर जडला जीव 

point

विवाहास तरुणीचा नकार 

Crime News : दिल्लीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 47 वर्षीय व्यक्तीचे आपल्या 20 वर्षाय मुलीसोबत विवाह करणार होता. तरुणीने विवाहास नकार दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने पेट्रोलची बाटली घेतली आणि तो फॅक्टरीत गेला होता. लग्नाला विरोध मिळाल्याने त्या व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतलं. या प्रकरणात व्यक्तीचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणीसोबत नाते जुळले नसल्याने मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे. 

हे ही वाचा : पत्नीचे विवाहबाह्य संबंध, पतीची हत्या करून मृतदेह बैलगाडीतून फेकला

47 वर्षीय व्यक्तीचे मित्राच्याच मुलीवर जडला जीव 

मृत तरुणाची ओळख संदीप अशी समोर आली, तो उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर येथील रहिवासी होता. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलं आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप आपल्या मित्राच्या घरी जायचा. यादरम्यान त्याचा मित्राच्याच मुलीवर जीव जडला होता. तरुणी दिल्लीच्या वजीपुर इंडस्ट्रीयल एरियामध्ये भांड्याच्या एका फॅक्टरीत काम करत होती. ती दिल्लीत एकटीच राहत होती. 

पोलिसांच्या अनुसार, संदीप हा तरुणीला सतत फोन करू लागला होता. काही काळापासून तिने त्याच्याशी बोलणंच बंद करून टाकलं होतं. ज्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. तो गुरुवारी दिल्लीत आला होता, दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी तो पेट्रोलच्या दोन बाटल्या घेऊन तरुणीच्या फॅक्टरीत पोहोचला होता. 

विवाहास तरुणीचा नकार 

पोलिसांच्या माहितीनुसार, संदीपने तरुणीशी विवाह करण्याचा हट्टा धरला होता. तिने नकार दिल्यानंतर त्याने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवलं. फॅक्टरीत कामगार तात्काळ त्याच्या मदतीला धावले, नंतर आग विजवण्याचा प्रयत्न केला. संदीपला दीपचंद बंधू रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला. 

हे ही वाचा : Astrology : 'या' राशींना नशीबाची लाभणार साथ, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

संदीपने एक चिठ्ठी मागे ठेवली होती, ज्यात त्याने दावा केला की, महिलेनं त्याच्याशी मैत्री तोडली होती. तिच्या मृत्यूसाठी त्याने हेच कारण जबाबदार धरले. मात्र महिलेनं पोलिसांना सांगितलं की, संदीपसोबत तिचे कोणतेही नाते नव्हते. सध्या, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेची माहिती संदीपच्या कुटुंबीयांना देण्यात आली होती.