पत्नीचे विवाहबाह्य संबंध, पतीची हत्या करून मृतदेह बैलगाडीतून फेकला
Crime News : पत्नीच्या विवाहबाह्य संबंधातून झालेल्या वादातून तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हत्येमागे तरुणाची पत्नी आणि गावातील एका व्यक्तीचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. याच अनैतिक प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृणपणे हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मृतदेहावर जखमा आढळल्या
पत्नीचे संतोष नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध
Crime News : पत्नीच्या विवाहबाह्य संबंधातून झालेल्या वादातून तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हत्येमागे तरुणाची पत्नी आणि गावातील एका व्यक्तीचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. याच अनैतिक प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी सांगितलं की, हत्येनंतर एका बैलगाडीत ठेवला आणि गावाबाहेर फेकून देण्यात आला होता. मृतदेह आढळून आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावात तणावजन्य स्थिती निर्माण झाली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास केला. तेलंगणातील जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेनं केवळ गावच नाहीतर सारा जिल्हा हादरून गेला आहे.
हे ही वाचा : Astrology : 'या' राशींना नशीबाची लाभणार साथ, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य
मृतदेहावर जखमा आढळल्या
मृत व्यक्तीची अजमीरा चंदू अशी ओळख पटली आहे. त्याचाच मृतदेह हा शनिवारी गावाबाहेर आढळून आल्याची घटना आहे. त्याच्या शरीरावर जखमा होत्या. घटनेची माहिती मिळताच, भूपालपल्लीचे डीएसपी संपत राव पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला.
पत्नीचे संतोष नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध
पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले की, चंदूची पत्नी पवनी हिचे दरावत गावातील रहिवासी असलेल्या संतोष नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. यामुळे शुक्रवारी चंदु आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. पोलिसांना संशय होता की, संतोषने पावनीसोबत मिळून शुक्रवारी चंदूची हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपासातून समोर आले की, ही हत्या चंदूच्या घरीच झाली होती.
हे ही वाचा : नवऱ्यासोबत भांडण झालं, संतापाच्या भरात अमरावतीची महिला ठाण्याला आली अन् घडलं भयंकर
पोलिसांना संशय आहे की, हत्येनंतर मृतजदेह हा बैलगाडीवर ठेवून गावाबाहेर ठेवण्यात आला आणि तिथे फेकून देण्यात आला. डीएसपी संपत राव यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासातून चंदूची पत्नी आणि संतोषचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दोन्ही संशयितांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
