30 सेकंदात तब्बल 195 वेळा Kiss, Video व्हायरल

मुंबई तक

30 Second in 195 Kisses : एका तरुणाने केवळ 30 सेकंदात तब्बल 195 वेळा किस केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्या तरुणाच्या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नमूद करण्यात आली. संबंधित जोडपं हे ब्रीजल येथील आहे. या घटनेची जगभरात आता चर्चा होऊ लागलेली आहे.

ADVERTISEMENT

30 Second in 195 Kisses
30 Second in 195 Kisses
Google CTA

बातम्या हायलाइट

point

30 सेकंदात तब्बल 195 वेळा किस

point

गिनीज वर्ल्ड बुकने घेतली दखल 

30 Second in 195 Kisses : एका तरुणाने केवळ 30 सेकंदात तब्बल 195 वेळा किस केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्या तरुणाच्या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नमूद करण्यात आली. संबंधित जोडपं हे ब्रीजल येथील आहे. या घटनेची जगभरात आता चर्चा होऊ लागलेली आहे. तरुणाचं नाव रेनाटो बायमा गैया आणि गर्लफ्रेंड नायारा रोबर्टा रिबेरो डी मारिन्स अशी ओळख समोर आली. 

हे ही वाचा : डिलिव्हरी बॉय महिलेच्या घरात घुसला, बाथरूममध्ये जाऊन केलं अश्लील कृत्य

30 सेकंदात तब्बल 195 वेळा किस

रेनाटो बायमा गैया आणि गर्लफ्रेंड नायारा रोबर्टा रिबेरो डी मारिन्स या जोडप्यांनी 30 सेकंदात तब्बल 195 वेळा किस केल्याचे वृत्त आहे. इंटरनॅशनल किसींग डे दिवशी हा विक्रम करण्यात आल्याची माहिती समोर आली. दोघांनीही सांगितलं की, ते दुनियातील सर्वात भारी जोडपं आहे. 

दरम्यान, 6 जुलै 2026 रोजी दरवर्षी 'किस डे' साजरा केला जातो. याची सुरूवात ही युके या देशातून झाली होती. नंतर काही देशांत हा दिवस किस डे म्हणून साजरा केला जाऊ लागला होता. दोघेही मागील दीड वर्षांपासून नातेसंबंधात आहेत. दोघेही डॉक्टर असून त्यांनी कोव्हिडमध्ये रुग्णांची चांगली सेवा केली होती. 

हे ही वाचा : बाईक चोरीचा संशय, तरुणाला विजेचा शॉक; Video व्हायरल

गिनीज वर्ल्ड बुकने घेतली दखल 

रेनाटोने सांगितलं की, त्याने अनेकदा गिनीजबुकमध्ये विक्रम केलेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, त्याने 10 पुस्तके खाली पाडण्याचा, तसेच पाय फिरवण्यात विक्रम केला होता. पुढे रेनाटो म्हणाला की, त्याला वाटले की, तो सर्वाधिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारा ब्राझिलियन बनला आहे. तो असंही म्हणाला की, त्याला आपल्या या कामगिरीत त्याची पार्टनसर नायराच्या नावाचा देखील समावेश हवा आहे. 

हे वाचलं का?