बाईक चोरीचा संशय, तरुणाला विजेचा शॉक; Video व्हायरल

मुंबई तक

Crime News : तरुणाने बाईक चोरी केल्याच्या संशयातून काही तरुणांनी संबंधित तरुणाला शेतात एका खांब्याला बांधले. नंतर त्याला विजेच्या तारेचा शॉक देण्यात आला, संबंधित अमानुष कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दुचाकी चोरीच्या संशयातून तरुणाला विजेचा शॉक दिला

point

व्हिडिओ मोबाईलमध्ये केला कैद 

Crime News : मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. कोतवाली ठाणे क्षेत्रात पिपलई डॅमजवळ काही टग्यांनी कायदा हातात घेत तरुणाला अमानुष मारहाण केली. एवढंच नाही,तर पीडित तरुणाला विजेच्या तारेनं झटका देखील दिला, याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. या घटनेनं परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हे ही वाचा : Astrology : जुलै महिन्याच्या शेवटी मोठे फेरबदल, 'या' राशींचे भाग्य उजळणार

दुचाकी चोरीच्या संशयातून तरुणाला विजेचा शॉक दिला

घडलेल्या घटनेनुसार, धनियोखेडी येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाने दुचाकीची चोरी करण्याच्या संशयातून पकडलं. नंतर त्याच्यावर चोरीचा आरोप करून काही टग्यांनी सर्व क्रूरतेची परिसीमा पार केली. संबंधित तरुणांनी पीडिताला शेतात एका खांबाला बांधलं. नंतर विजेच्या तारेच्या सहाय्याने विजेचा शॉक दिला होता. 

व्हिडिओ मोबाईलमध्ये केला कैद 

या अमानवी कृत्यादरम्यान तरुणाचा जीव देखील गेला असता, मात्र तो थोडक्यात बचावला. तरुण ओरडतच राहिला होता, मात्र संबंधितांना माया फुटली नाही. आरोपींनी त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला, नंतर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. अशातच स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

हे ही वाचा : ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत अडचणीत, सुनेचे गंभीर आरोप, गुन्हा दाखल

या घटनेवर प्रतिक्रिया देत पोलिसांनी सांगितलं की, या घटनेची तक्रार अद्याप दाखल झालेली नाही. यामुळे अजून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परिस्थिती पाहून नागरिकांनी मानवाधिकार आयोगाकडे तात्काळपणे त्याची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. लोकांचं म्हणणं असं की, व्हायरल झालेला व्हिडिओ हाच मोठा पुरावा आहे. 

हे वाचलं का?