मोदींचे 'Blue Eyed Boy' असलेल्या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातून दिल्लीत नेणं इतकं सोपं आहे का?
Devendra Fadnavis Delhi Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलावण्याच्या शक्यतेबाबत वेळोवेळी चर्चा होते. पण फडणवीसांना दिल्लीत नेण्याचा निर्णय झाला, तर महाराष्ट्र भाजपवर त्याचा नेमका काय परिणाम होईल? याबबातच्या चर्चा किती व्यावहारिक वाटतात? जाणून घ्या याबाबात सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चा सातत्याने रंगली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाणार. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर हा मुद्दा सातत्याने पुढे येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात देवेंद्र फडणवीस हे प्रभावी आणि विश्वासार्ह चेहरा मानले जात असल्याने त्यांना दिल्लीत बोलावण्याच्या शक्यतेबाबत वेळोवेळी चर्चा होते.
पण या चर्चेकडे केवळ अफवा किंवा राजकीय गॉसिप म्हणून पाहता येणार नाही. कारण त्यामागे महाराष्ट्रातील भाजपची संघटनात्मक रचना, निवडणूक व्यवस्थापन, दिल्लीतील नेतृत्वाचा विश्वास आणि राज्यातील सत्तेचं गणित अशा अनेक महत्त्वाच्या बाबी जोडल्या आहेत. यामुळेच मोदींचे 'Blue Eyed Boy'असलेल्या फडणवीसांना दिल्लीत नेणं इतकं सोपं नाही!
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपचा सर्वात मोठा चेहरा
गेल्या दहा-बारा वर्षांत महाराष्ट्र भाजपमध्ये अनेक नेते पुढे आले. मात्र राज्यव्यापी स्वीकार, निवडणूक व्यवस्थापन आणि संघटनात्मक पकड या तिन्ही बाबतीत फडणवीसांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
हे ही वाचा>> पवार स्वत: शिंदेंच्या दालनात गेले.. याचा अर्थ दिसतो तेवढा सरळ-सोप्पा नाही! भेटीमागची भन्नाट Inside Story
2014 मध्ये प्रथमच महाराष्ट्रात भाजपचा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय झाला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने शंभरच्या पुढे जागा जिंकल्या. सत्ता समीकरणं बदलली असली तरी पक्षाच्या मताधिक्यात फारशी घट झाली नव्हती. 2022 मध्ये झालेल्या सत्तांतरानंतरही महाराष्ट्रातील भाजपची संघटनात्मक ताकद कायम राहिली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपने ऐतिहासिक यश मिळवलं.










