72 तास मृत्यूशी झुंज, ढिगाऱ्याखालून पत्नीला सेल्फी पाठवला, अन् मिळालं नवजीवन
moshi building collapse survivor vijay sapkal last selfie : मोशी दुर्घटनेला 72 तास उलटले तरी बचावकार्य सुरूच असून विजय सपकाळ यांच्या जिद्दीची कहाणी सर्वांना भावूक करत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
72 तास मृत्यूशी झुंज
ढिगाऱ्याखालून पत्नीला सेल्फीसह मेसेज पाठवला
अन् मिळालं नवजीवन
moshi building collapse survivor vijay sapkal last selfie : मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेला 72 तास उलटले असले तरी बचावकार्य अद्याप सुरूच आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात अनेक कर्मचारी ढीगाऱ्याखाली आणि इमारतीच्या पिलर्सजवळ अडकले होते. आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 16 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून सात जणांचा शोध अद्याप सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दोन जण दिसत असले तरी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. एनडीआरएफच्या माहितीनुसार, बचावकार्य आज मध्यरात्रीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा : Govt Jobs : भारत सरकारच्या 'या' कंपनीत भरती सुरु, महिना 1 लाख 20 हजार रुपये पगार!
विजय सपकाळ यांची कहाणी सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारी
या दुर्घटनेतून सुखरूप बाहेर पडलेले विजय सपकाळ यांची कहाणी सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे. ढिगाऱ्याखाली अडकल्यानंतर आपण आता वाचणार नाही, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्यांनी आपल्या पत्नीला सेल्फी पाठवत, "मी इमारतीखाली अडकलो आहे... लवकर ये," असा संदेशही पाठवला होता. जवळपास नऊ तास ते अडकून होते. त्यांच्या पायावर मोठा खांब पडला होता. आजूबाजूला काचेचे तुकडे आणि मलबा पसरला होता. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडणाऱ्या मिथेन वायूमुळे श्वास घेणेही कठीण झाले होते. तरीही त्यांनी धीर सोडला नाही. स्वतःसोबत अडकलेल्या इतर कर्मचाऱ्यांना आवाज देत त्यांची विचारपूस केली आणि एकमेकांचे मनोबल वाढवत राहिले.
हेही वाचा : मुंबईची खबर : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत किती पाणी? पाणीकपात थांबणार का?










