मुंबईची खबर : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत किती पाणी? पाणीकपात थांबणार का?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत तलावांची पाणीपातळी कमीच आहे. सध्या या तलावांमध्ये किती पाणा आहे, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत किती पाणी?
पाणीकपात थांबणार का?
Mumbai News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही मुख्य जलाशयांच्या क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. 10 जुलै ते 11 जुलै दरम्यान 24 तासांत पडलेल्या पावसामुळे या सर्व जलाशयांमधील एकूण पाणीसाठा आता 49.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईला वर्षभर अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण 14,47,363 दशलक्ष लीटर क्षमतेच्या तुलनेत सध्या तलावांमध्ये 7,21,278 दशलक्ष लीटर इतका उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.
पाणी कपातीचे संकट टळणार?
गेल्या 24 तासांत पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या या सातही प्रमुख जलाशयांच्या पाणीसाठ्यात एकूण 0.42 टक्क्यांची समाधानकारक वाढ नोंदवली गेली आहे. जरी मागच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये याच तारखेला तलावांमध्ये 73.88टक्के इतका प्रचंड जलसाठा उपलब्ध होता. जलसाठ्यातील ही संथ परंतु सातत्यपूर्ण वाढ आगामी दिवसांतील पाणी कपातीचे संकट दूर करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
हे ही वाचा : जामीनावर सुटताच रक्तरंजीत कांड, पत्नी अन् पोरा-बाळांसह 6 जणांची हत्या
'हे' 2 तलाव ओसंडून वाहताहेत
या सात जलाशयांपैकी दोन महत्त्वाचे तलाव आधीच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत, ही मुंबईकरांसाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेला 'विहार तलाव' 7 जुलैलाच ओसंडून वाहू लागला असून, त्यात सध्या 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, 'तुळशी तलाव' देखील 7 जुलैला रात्री पूर्ण भरून वाहू लागला असून, त्यातही 100 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या दोन लहान तलावांमधील ओसंडून वाहणारे पाणी मुंबईकरांची चिंता काही अंशी कमी करत आहे.
हे ही वाचा : 23 वर्षीय प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेला अन् गमावला जीव, 19 वर्षीय तरुणासोबत काय घडलं?
इतर तलावांमध्ये किती पाणी?
इतर मोठ्या तलावांचा विचार केला तर, मोदक सागर तलावामध्ये 82.60 टक्के आणि तानसा तलावामध्ये 78.57 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावात 44.25 टक्के पाणी जमा झाले आहे, तर मध्य वैतरणा तलावात 43.51 टक्के आणि अप्पर वैतरणा तलावात 28 टक्के पाणीसाठा आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी 6 जुलै रोजी मध्य वैतरणाचे दरवाजे बंद करण्यात आले होते, तर त्याच दिवशी अप्पर वैतरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला होता. मुंबईच्या भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रात आतापर्यंत एकूण 1716 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.










