जामिनावर सुटताच रक्तरंजित कांड, पत्नी अन् पोरा-बाळांसह 6 जणांची हत्या

Telangana Crime News : तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात POCSO प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सहा जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जामिनावर सुटल्यानंतर आरोपीने पत्नी, दोन मुलांसह तक्रारदार अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

Telangana Crime News
Telangana Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जामीनावर सुटताच रक्तरंजीत कांड

point

पत्नी अन् पोरा-बाळांसह 6 जणांची हत्या

Crime News : तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात शनिवारी पहाटे घडलेल्या सहा जणांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. शाबाद मंडलमधील दैवलागुडा गावात ही धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, POCSO कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेत तपासाची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.

हेही वाचा : नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, उझबेकिस्तानसह इतर राज्यांतील तरुणींची सुटका

 पीडितेसह तिच्या कुटुंबातील दोघांना संपवलं 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीची ओळख 28 वर्षीय राज कुमार अशी झाली आहे. तपासानुसार, आरोपीने सर्वप्रथम स्वतःची पत्नी पार्वती सरिता (30) आणि त्याचे दोन लहान मुलगे परीक्षित (3) व दैविकक्षित (2) यांची हत्या केली. त्यानंतर त्याने यापूर्वी स्वतःविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत तक्रार दाखल करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता त्या मुलीची आई चिट्याला लक्ष्मी (45) आणि आजी चिट्याला रुक्कम्मा (65) यांनाही आरोपीने ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले. या सहा हत्यांमुळे संपूर्ण गावात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Personal Finance: सोने-चांदी खरेदी करताना 'या' 10 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर होऊ शकते हजारोंचे नुकसान

जामिनावर सुटका होताच आरोपीचं रक्तरंजीत कांड 

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीला यापूर्वी POCSO प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. या गुन्ह्याचा राग मनात ठेवूनच आरोपीने हा हत्याकांड घडवून आणला का, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी अल्पवयीन मुलीला एका शेतात घेऊन गेला. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर इतर पीडितांवरही प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या संपूर्ण घटनाक्रमाचा तपास पोलीस विविध अंगांनी करत आहेत.

सध्या पोलिसांकडून या हत्याकांडाच्या सर्व परिस्थितींचा बारकाईने तपास सुरू आहे. घटनास्थळ सुरक्षित करण्यात आले असून फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः या तपासावर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणातील प्रत्येक बाब तपासून हत्येमागील कारण आणि घटनाक्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तपास जसजसा पुढे जाईल तसतशी अधिक माहिती समोर येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.