दूध घेऊन घरी येत होती, वाटेतच कुदळीने केले वार, 7 वर्षीय मुलीला कुणी संपवलं?

मुंबई तक

दूध घेऊन येत असताना एका 7 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे. आरोपीने कुदळीने वार करुन तिची हत्या केली. बिहारमधील या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दूध घेऊन घरी येत होती

point

वाटेतच कुदळीने केले वार

point

7 वर्षीय मुलीला कुणी संपवलं?

Crime News : काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका सात वर्षीय चिमुरडीची कुदळीने वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्वरित कारवाई करत आरोपी राजू शाह याला अटक केली आहे. तसेच फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या पथकालाही पाचारण करण्यात आले असून, त्यांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. प्रीती कुमारी असं मृत मुलीचं नाव आहे. बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील ही घटना आहे.

दूध घेऊन घरी परतत असताना हल्ला

मृत मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शंभू शाह हे आपल्या मुलीसह गावातून दूध घेऊन घरी परतत होते. वडील पुढे चालत होते, तर सात वर्षांची प्रीती हातात दुधाची बाटली घेऊन त्यांच्या मागे-मागे येत होती. दरम्यान, शेजारी राहणारा राजू शाह हा अचानक हातात कुदळ घेऊन तिथे आला आणि त्याने चिमुरडीवर एकामागून एक सपासप वार करण्यास सुरुवात केली. आरोपीने निष्पाप मुलीवर अनेक वार केल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण हल्ल्यात मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. चिमुरडीच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला.

हे ही वाचा : Monsoon Update: पावसाने का घेतला अचानक ब्रेक? 'ही' 2 कारणं महत्त्वाची!

आरोपीचं घर पेटवलं

या अमानुष घटनेमुळे गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. संतप्त ग्रामस्थ आरोपीचा पाठलाग करत थेट त्याच्या घरापर्यंत पोहोचले. लोकांचा आक्रोश इतका प्रचंड होता की, त्यांनी आरोपीच्या घराला आग लावून दिली. गावात परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांना शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

हे ही वाचा : Personal Finance: सोने-चांदी खरेदी करताना 'या' 10 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर होऊ शकते हजारोंचे नुकसान

हत्येमागे कारण काय?

पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपी राजू शाह याला ताब्यात घेत अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीची कसून चौकशी केली जात असून हत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे, एफएसएलच्या पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. एका सात वर्षांच्या निष्पाप मुलीची आरोपीने इतक्या निर्घृणपणे हत्या का केली, यादृष्टीने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. सध्या मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, गावातील तणावपूर्ण वातावरण पाहता तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 

हे वाचलं का?