नोकरीचं आमिष दाखवून महिला महिनाभर ओलीस, वेश्याव्यवसायासाठी आणला दबाव

मुंबई तक

Crime News : एका तरुणीला काम देण्याच्या बहाण्याने भेटण्यास बोलावलं, नंतर तिला एका हॉटेलमध्ये बंद करून लैंगिक अत्याचार करण्यात आला. नंतर तिच्यावर वेश्याव्यवसायाचा दाबाव करण्यात आला होता. तिने नकार दिल्याने तिला बेदम मारहाण केली, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

वेश्याव्यवसायाला विरोध केल्याने पीडितेला मारहाण 

point

नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

Crime News : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका तरुणीला काम देण्याच्या बहाण्याने भेटण्यास बोलावलं, नंतर तिला एका हॉटेलमध्ये बंद करून लैंगिक अत्याचार करण्यात आला. नंतर तिच्यावर वेश्याव्यवसायाचा दाबाव टाकण्यात आला. तिने नकार दिल्याने तिला बेदम मारहाण केली, तिने नकार दिल्याने तिला बेदम मारहाण केली, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. 

हे ही वाचा : लातूर: ड्रायव्हर फोनवर बोलत होता, शाळेची बस पलटी होऊन अपघातात 23 विद्यार्थी जखमी

वेश्याव्यवसायाला विरोध केल्याने पीडितेला मारहाण 

पीडितेनं वेश्याव्यवसायाला विरोध केल्याने तिला बेदम मारहाण केली. महिलेनं लखनऊ येथील चिनहटच्या लाउलाई येथील रहिवासी असलेल्या अनिल सिंहच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. बुधवारी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. पोलिसांनी मुलीला सीतापूरच्या मानपूर येथून ताब्यात घेतलं, नंतर आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.  

नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

महिलेनं सांगितलं की, ती इव्हेंट मॅनेमेंटचं काम करते. एका महिन्यापूर्वी ती कामाच्या शोधात होती. नोकरीच्या निमित्ताने तिची एका मैत्रिणीशी ओळख झाली होती. त्या मैत्रिणीने तिचा मित्र अनिल कुमार सिंहसोबत ओळख करून दिली होती. संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की, अनिल कुमार सिंहने तिला नोकरीचे आमिष दाखवून तिची फसवणूक केली. तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. तिला एक महिन्यांपासून हॉटेलमध्ये बंदी बनवून ठेवलं, नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट: पावसामुळे कर्मचाऱ्याने रजा मागितली, मॅनेजरनं थेट नाकारली; स्क्रीनशॉट व्हायरल

वेश्याव्यवसायासाठी नकार दिल्यावर बेदम मारहाण

महिलेला वेश्याव्यवसायासाठी दबाव आणण्यात आला होता, तिने नकार दिल्यानंतर तिला बेदम मारहाण केली. आरोपीने पीडितेच्या मुलीला देखील ताब्यात ठेवलं होतं, पीडितेनं कसातरी हॉटेलमधून पळ काढला आणि पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी अनिलला अटक केली. तसेच पीडितेच्या मुलीला देखील पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सोडवलं. नंतर मुलीला आईच्या ताब्यात दिलं, या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

हे वाचलं का?