पुण्याची गोष्ट: पावसामुळे कर्मचाऱ्याने रजा मागितली, मॅनेजरनं थेट नाकारली; स्क्रीनशॉट व्हायरल

Pune News : पुण्यात एक लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. एका कंपनीतील कर्मचाऱ्याने मुसळधार पाऊस कोसळत असल्याने बॉसकडे रजेची मागणी केली होती. मात्र, बॉसने क्षणाचाही विलंब न करता थेट रजेचा नकार दिला. बॉसच्या या कृत्याने कर्मचाऱ्याला नोकरी सोडावी की नाही असा संभ्रम निर्माण झाला.

ADVERTISEMENT

Pune News
Pune News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पाऊस असुनही व्यवस्थापकाने कर्मचाऱ्याची रजा नकारली

point

चॅट्स आले समोर

पुण्याची गोष्ट : पुण्यात एक लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. एका कंपनीतील कर्मचाऱ्याने मुसळधार पाऊस कोसळत असल्याने बॉसकडे रजेची मागणी केली होती. मात्र, मॅनेजरने क्षणाचाही विलंब न करता थेट रजेचा नकार दिला. मॅनेजरच्या या कृत्याने कर्मचाऱ्याला नोकरी सोडावी की नाही असा संभ्रम निर्माण झाला. संबंधित प्रकरणातील बॉस आणि कर्मचाऱ्याचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. 

हे ही वाचा : "रमेश म्हात्रेंना अटक करा अन्यथा..", रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा

चॅटमध्ये नेमकं काय? 

कर्मचारी : "हाय, पावसामुळे रस्ते बंद असून मी कामावर येऊ शकत नाही", असं संबंधित कर्मचाऱ्याने मेसेज केला. 

मॅनेजर : (नंतर व्यवस्थापकाने रिप्लाय देत लिहिलं) "सरकारी वाहने किंवा लोकलचा वापर कर किंवा उबेरचा वापर करून ऑफिसला ये". नंतर मॅनेजर म्हणाला, "मी सुट्टी देऊ शकत नाही, कारण आम्ही सर्व कामावर आलोय," असं म्हणत त्याने कर्मचाऱ्याला थेट सुट्टीसाठी नकार दिला. 

या प्रकरणी अनेकांनी मॅनेजरच्या या अशा कृत्यावर टिका केली आहे. कंपनीचे नाव उघड करून तिला धडा शिकवा असे काही नेटकऱ्यांनी लिहिले.  

पुण्यातील शाळांना रविवारपर्यंत सुट्टी 

दरम्यान, राज्यातील मुसळधार पाहता, रस्त्याला नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले. पुण्यात रविवारपर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्याची देखील परवानगी देण्यात आली, मात्र अशातच हा मेसेज सर्वत्र व्हायरल होताना दिसतो. 

हे ही वाचा : लातूर: ड्रायव्हर फोनवर बोलत होता, शाळेची बस पलटी होऊन अपघातात 23 विद्यार्थी जखमी

तर हवामान पाहता, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे हवामान विभागाने आणि प्रशासनाने आवाहन केलं होते. या मुसळधार पावसाने राज्यात अपघात होऊन अनेकांचे बळी गेलेत. मात्र, अशा स्थितीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.