लातूर: ड्रायव्हर फोनवर बोलत होता, शाळेची बस पलटी होऊन अपघातात 23 विद्यार्थी जखमी
Latur Students Bus Accident : लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चाकूर तहसिल परिसरातील राच्चानावाडी स्थित असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाची बस होती. सांडोळ-महांडोळ मार्गावर सकाळी 11 वाजता ही दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लातूरमध्ये बस अपघातात 23 विद्यार्थी जखमी
नवख्या वाचनचालकाचं बसवरून नियंत्रण सुटलं
Latur Students Bus Accident : लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चाकूर तहसिल परिसरातील राच्चानावाडी स्थित असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाची बस होती. सांडोळ-महांडोळ मार्गावर सकाळी 11 वाजता ही दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : "रमेश म्हात्रेंना अटक करा अन्यथा..", रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा
बस अपघातात 23 विद्यार्थी जखमी
घडलेल्या घटनेनुसार, बसमध्ये 35 विद्यार्थी होते, त्यापैकी 23 विद्यार्थ्यांचा अपघात झाला असून ते जखमी आहेत. सुदैवाची घटना म्हणजे कुठलीही जिवीतहानी झाली नाही. त्यांना तात्काळपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपास केला असता, डॉक्टरांनी जखमींची प्रकृती अगदी स्थिर असल्याची माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात झाल्यानंतर कळालं की, दररोजचा वाहनचालक नव्हता, तो सुट्टीवर गेल्याची माहिती समोर आली.
नवख्या वाचनचालकाचं बसवरून नियंत्रण सुटलं
अपघात झालेल्या बसचा नंबर MH 12 PQ 5120 असून वाहनचालक हा नवखा होता, त्याला वाहन चालवण्याचा फार अनुभव नव्हता. वाहन चालवताना वाहनचालक फोनवर बोलत होता. यामुळे त्याचं वाहनावरून नियंत्रण सुटलं आणि शाळेतून विद्यार्थ्यांना आणायला गेला असता हा अपघात झाला. या घटनेनं परिसर हादरून गेला.
हे ही वाचा : ‘एक डॉक्टर म्हणून मी…’, महिला डॉक्टरला मारणाऱ्या शिंदेंच्या नगरसेवकावर श्रीकांत शिंदेंची वक्रदृष्टी
अपघातानंतर 23 अपघाती विद्यार्थिनींना अॅम्बुलन्समधून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले होते. याच प्रकरणाचा पोलीस अधिकचा तपास करत आहेत. या घटनेनं संबंधित शाळा व्यवस्थापक वाचनचालकावर काही कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.










