तीर्थक्षेत्रासाठी कुटुंबासोबत गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

Crime News : एका निवारागृहात सहा वर्षांच्या मुलीवर कथितरित्या लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुलीसह तिचे कुटुंब तीर्थयात्रेसाठी आले होते, तेव्हा मुलीचे वडील जवळच्या सामुदायिक स्वयंपाकघरात जेवण्यास गेले असताना हा प्रकार उघडकीस आला.

ADVERTISEMENT

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तीर्थक्षेत्रासाठी कुटुंबासोबत गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

point

तीर्थक्षेत्रासारख्या पवित्र ठिकाणी महिला, मुली सुरक्षित नाहीत

Crime News : उत्तराखंडच्या रुडकी येथे एका निवारागृहात सहा वर्षांच्या मुलीवर कथितरित्या लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुलीसह तिचे कुटुंब रुरकी येथे तीर्थयात्रेसाठी आले होते, तेव्हा मुलीचे वडील जवळच्या सामुदायिक स्वयंपाकघरात जेवण्यास गेले होते. इतक्यातच हा लज्जास्पद प्रकार घडला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. 

हे ही वाचा : नानांसोबतची 'ती' इच्छा अपूर्णच.. रितेश देशमुखची भावनिक पोस्ट

तीर्थक्षेत्रासाठी कुटुंबासोबत गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात तीर्थयात्रेला एक कुटुंब आले होते. ते रुरकी येथे एक रात्री निवाऱ्यासाठी थांबले होते. कथितरित्या घडलेल्या घटनेत मुलीचे आई वडील हे जवळच्या सामुदायिक स्वयंपाक घरात जेवण्यास गेले होते. ते परततेपर्यंत मुलीने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती आपल्या आई बाबांना सांगितली होती. यानंतर पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. 

तसेच मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सर्कल ऑफिसर देवद्रत जोशी यांनी सांगितलं की, आरोपीला अटक करण्यासाठी अनेक पोलीस पथके तयार करण्यात आले होते. पोलीस रात्र निवारा केंद्र आणि जवळपासच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासत आहेत. 

हे ही वाचा : भिवंडी: गुलाबजामच्या भांड्यात आढळला उंदीर, Video व्हायरल अन् FDA ची कारवाई

याव्यतिरिक्त, संशयितांची चौकशी केली जात आहे, दरम्यान पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीला अटक करण्यासाठी संभाव्य ठिकाणी जाऊन छापा टाकला जात आहे. या अशा घटनेमुळे महिला, मुली तसेच तरुणी आता तीर्थक्षेत्रासारख्या पवित्र ठिकाणी देखील सुरक्षित नाहीत.