भिवंडी: गुलाबजामच्या भांड्यात आढळला उंदीर, Video व्हायरल अन् FDA ची कारवाई

मिथिलेश गुप्ता

Bhiwandi News : भिवंडीतील एका स्थानिक मिठाईच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या गुलाबजामुनच्या एका मोठ्या भांड्यात चक्क उंदीर फिरताना आढळून आला होता. या घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

Bhiwandi News
Bhiwandi News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

स्थानिक मिठाईच्या दुकानात उंदीर आढळला

point

पुढील आदेश मिळेपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री थांबवण्याचे निर्देश

Bhiwandi News : भिवंडीतील एका स्थानिक मिठाईच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या गुलाबजामुनच्या एका मोठ्या भांड्यात चक्क उंदीर फिरताना आढळून आला होता. या घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकरणात आता नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मिठाईच्या स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हे ही वाचा : नानांसोबतची 'ती' इच्छा अपूर्णच.. रितेश देशमुखची भावनिक पोस्ट

स्थानिक मिठाईच्या दुकानात आढळला उंदीर 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत विक्रीसाठी ठेवलेल्या गुलाबजामुनच्या मोठ्या कंटेनरमध्ये एक जिवंत उंदीर फिरताना आढळून आला होता. मिठाईच्या खाद्यपदार्थात उंदीर फिरत असल्याचे आढळून आले होते. संबंधित दुकानात खाद्यपदार्थांची स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम पाळले जातेय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी आता अन्न व औषध प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित मिठाई दुकानदाराला नोटीस बजावली आहे. 

पुढील आदेश मिळेपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री थांबवण्याचे निर्देश

पुढील आदेश मिळेपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री थांबवण्याचे निर्देश देण्यात आलेत अशी माहिती समोर आली. या घटनेनं मिठाई दुकानांमधील स्वच्छता, खाद्यपदार्थांची साठवणूक आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात संबंधित दुकानदाराच्या व्यवस्थापनावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. 

हे ही वाचा : हिंगोली हादरलं! ड्युटीवर असणाऱ्या इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्याची निर्घृपणे हत्या

दरम्यान, गुलाबजामुनच्या भांड्यात जिवंत उंदीर आढळल्याच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांकडून संबंधित दुकानावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.