हिंगोली हादरलं! ड्युटीवर असणाऱ्या इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्याची निर्घृपणे हत्या

मुंबई तक

Hingoli Crime : हिंगोली जिल्ह्यात ड्युटीवर असताना इंडियान ऑइलच्या एका अधिकाऱ्याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे, नेमकं काय घडलं जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Hingoli Crime
Hingoli Crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

इंडियान ऑइलचे अधिकारी महेश यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला 

point

आरोपींना दगडफेक करत गोंधळ

Hingoli Crime News : हिंगोली जिल्ह्यात ड्युटीवर असताना इंडियान ऑइलच्या एका अधिकाऱ्याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महेश शेळके (वय 37) अशी हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख समोर आली. महेश हे आपल्या पथकासोबत पेट्रोल पंपाला सील करून ताबा घेण्यासाठी चोंडी गावात गेले होते. या घटनेदरम्यान, पथकाचा पेट्रोल पंप मालकाच्या कुटुंबासोबत वाद झाला आणि दगडफेक करण्यात आली. 

हे ही वाचा : नानांसोबतची 'ती' इच्छा अपूर्णच.. रितेश देशमुखची भावनिक पोस्ट

नेमकं काय घडलं? 

महेश शेळके हे इंडियन ऑइल कॉर्पोरेट लिमिटेड नांदेड कार्यालयात व्यवस्थापक म्हणून काम करत होते. मंगळवारी दुपारी ते कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकासह हिंगोली जिल्ह्यातील वासमत तालुक्यातील पेट्रोल पंपावर पोहोचले होते. वादामुळे ते पेट्रोल पंप सील करून ताबा घेणार होती. हा पेट्रोल पंप पांडववीर कुटुंब चालवत होते. 

पोलिसांच्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावर पोहोचल्यानंतर कंपनीचे पथक आणि पांडववीर कुटुंबात अनेक तास बोलणे सुरू होते. घडलेल्या घटनेनुसार, कुटुंबाने एका महिनेला कालावधी मागितला होता आणि कंपनीला पंपाचा ताबा दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले. मात्र, कंपनीच्या पथकाने तात्काळपणे सील लावून ताबा घेण्याचा आग्रह धरला. याच मुद्द्यावरून सुरु असलेल्या वादाने अचानक हिंसक वळण घेतले होते. 

इंडियान ऑइलचे अधिकारी महेश यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला 

संबंधित प्रकरणात हिंगोली पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या म्हणण्यांनुसार, प्राथमिक तपासातून समोर आले की, वादविवादादरम्यान उमेश पांडववीरने महेश शेळकेवर खंजीरने हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशवर सात वेळा सपासप वार करण्यात आले होते. याच वादादरम्यान इतर काही आरोपींनी दगडफेक करत घटनास्थळी गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर गंभीर जखमी झालेल्या महेशला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.