कोंचिग क्लासवरून परतताना विद्यार्थीनीचा रस्ता अडवला, दोघांनी केली छेडछाड
crime news : कोंचिग क्लासवरून परतताना विद्यार्थीनीसोबत छेडछाड केल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान दोन तरुणांनी पीडितेचा रस्ता आडवला होता, त्यानंतर कथितरित्या तिच्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोंचिग क्लासवरून परतताना विद्यार्थीनीचा रस्ता अडवला
112 फोन नंबर डायल करून तरुणांना दिले पोलिसांच्या ताब्यात
Crime News : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कोंचिग क्लासवरून परतताना विद्यार्थीनीसोबत छेडछाड केल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान दोन तरुणांनी पीडितेचा रस्ता आडवला होता, त्यानंतर कथितरित्या तिच्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. अचानक रस्ता अडवल्याने पीडित विद्यार्थीनी भयभीत झाली आणि विद्यार्थीनी भयभीत झाली, यानंतर पीडितेनं परिसरात आरडाओरड करण्यास सुरूवात केली होती.
हे ही वाचा : भिवंडी: गुलाबजामच्या भांड्यात आढळला उंदीर, Video व्हायरल अन् FDA ची कारवाई
112 फोन नंबर डायल करून तरुणांना दिले पोलिसांच्या ताब्यात
विद्यार्थीनीचा आवाज ऐकून आसपासचे काही लोक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की, दोन्ही तरुण घटनास्थळावरून परतण्याचा प्रयत्न करताना, ग्रामस्थांनी त्यांना पकडले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यांनी 112 फोन नंबर डायल करून तरुणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या मोहम्मद मोताबी आणि मोहम्मद शमीम अशी ओळख समोर आली. दोघेही रामहुरहरि ठाणे क्षेत्रातील रहिवासी आहेत. या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या काकाच्या जबाबावरून मीनापुर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला आहे.
हे ही वाचा : हिंगोली हादरलं! ड्युटीवर असणाऱ्या इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्याची निर्घृपणे हत्या
डीएसपी पूर्व अजय वत्स यांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलीसोबत छेडछाडीची तक्रार मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामीण लोकांनी 112 या नंबरवर डायल करून पोलिसांना बोलावले आणि आरोपींना अटक केली. या प्रकरणात पोलीस आरोपींवर कारवाई करत असल्याची माहिती आहे.
