आजी झोपेत असताना नातवाकडून 24 वेळा सपासप वार, दुर्दैवी घटनेनं गाव हादरलं
crime news : नातवाने आजी झोपली असताना तिच्यावर तब्बल 24 वेळा सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. नात ही आपल्या आजीसोबत एका खोलीत झोपला असताना ही दुर्दैवी घटना घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आजीवर झोपेत नातवाकडून 24 वेळा सपासप वार
आरोपी नातवाला केली अटक
Crime News : नातवाने आजी झोपली असताना तिच्यावर तब्बल 24 वेळा सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. नात ही आपल्या आजीसोबत एका खोलीत झोपला असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसर पूरता हादरून गेल्याचे वृत्त आहे. मतक आजीची ओळख खातून (वय 85) अशी समोर आली. तसेच हत्या केलेल्या नातवाची साहेब हुसैन (वय 21) अशी ओळख समोर आली. या प्रकरणात आरोपी साहेब हसैनला अटक केली आहे. ही घटना बिहारच्या गोपालगंज येथील बनरहां गावातील आहे.
हे ही वाचा : जालना: चॉकलेटचे अमिष दाखवून 9 वर्षीय मुलीचा विनयभंग
आजीवर झोपेत नातवाकडून 24 वेळा सपासप वार
जेवणानंतर साहेब हुसैन हा आपल्या आजीसोबत एका खोलीत झोपला होता. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास तो उठला आणि त्याने आपल्या आजीवर चाकूने सपासप तब्बल 24 वेळा वार केले. या प्राणघातक हल्ल्यात आजी खातून यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा स्थितीत घटनास्थळी असलेला मामे भावाने हे चित्र पाहताच तो भयभीत झाला होता. त्याने आरडाओरड करून घटनास्थळावरून गावातील काही लोकांना सांगितले.
आरोपी नातू साहेब हुसैन अटकेत
ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी घटनेचा तपास केला आणि अथक प्रयत्नातून आरोपी साहेब हुसैनला अटक केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि एका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन तपास केला आणि पुरावे गोळा केले.
हे ही वाचा : बकरी चारायला गेली मुलगी, नराधमानं लहान भावासमोर केला अत्याचार
पोलिसांनी तपासादरम्यान, हल्ल्यात वापरलेले धारदार शस्त्र, इतर काही वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. संबंधित प्रकरणात आता पोलीस आरोपीची चौकशी करत आहे. अखेर तरुणाने आपल्या आजीची हत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा आता पोलीस कसून तपास करत आहेत.
