बकरी चारायला गेली मुलगी, नराधमानं लहान भावासमोर केला अत्याचार
crime news : एका निष्पाप मुलीवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. अल्पवयीन मुलगी ही घराच्या काही अंतरावर शेळ्या चारत होती. तिचा लहान भाऊ तिच्यासोबतच होता. अशावेळी शेजारचा अल्पवयीन मुलगा त्या मुलीजवळ गेला आणि तिच्या लहान भावासमोरच तिला एका निर्जनस्थळी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
निष्पाप मुलीवर अमानुषपणे अत्याचार
पीडितेच्या भावासमोर लुटली अब्रू
Crime News : एका निष्पाप मुलीवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. अल्पवयीन मुलगी ही घराच्या काही अंतरावर शेळ्या चारत होती. तिचा लहान भाऊ तिच्यासोबतच होता. अशावेळी शेजारचा अल्पवयीन मुलगा त्या मुलीजवळ गेला आणि तिच्या लहान भावासमोरच तिला एका निर्जनस्थळी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला आणि नंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना बिहारच्या खगरिया जिल्ह्यातील आहे.
हे ही वाचा : "आई काळी जादू करते...", लेकाचा भलताच संशय डिझेल टाकून आईला पेटवलं
मुलीने सांगितलेली हकीकत ऐकून कुटुंब हादरले
या प्रकरणात पीडितेचा लहान भाऊ हा घटनास्थळी उपस्थित होता, तो भयभीत झाला होता आणि त्यालाही याबाबत काहीच समजत नव्हते, म्हणून तो घरी पळून गेला होता. घरी पोहोचताच त्याने आपल्या कुटुंबावर संपूर्ण घटना सांगितली होती. मुलीने सांगितलेली हकीकत ऐकून कुटुंब पुरते हादरून गेले होते. कुटुंब तात्काळपणे मैदानाकडे धावले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली होती, नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नंतर पीडितेनं पोलिसांना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांच्या मते, मुलगी ही धोक्याबाहेर असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या प्रकरणात खगरियाचे एसपी पुष्कर आनंद यांनी सांगितलं की, आरोपी हा अल्पवयीन आहे, तातडीने कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील चौकशी केली. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.
हे ही वाचा : चेटकीण असल्याचा आरोप करत महिलेचे कपडे काढले, कारवाईऐवजी पोलिसांनी घेतले आशीर्वाद
पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
दरम्यान, पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी लोक करत आहेत.
