चेटकीण असल्याचा आरोप करत महिलेचे कपडे काढले, कारवाईऐवजी पोलिसांनी घेतले आशीर्वाद
Crime News : महिलेवर चेटकीण असल्याचा आरोप करून तिला बेदम मारहाण केली. एवढंच नव्हे तर तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न देखील केला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, न्याय देण्याऐवजी पोलिसांनी आशीर्वाद घेण्यास सुरूवात केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घटनेदरम्यान आरोपींकडून महिलेची साडी ओढण्याचा प्रयत्न
पीडितेकडून न्यायाची प्रतिक्षा
Crime News : बिहारच्या भागलपूर येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाहाकुंड पोलीस ठाणे हद्दीतील पचरुखी गावात एका महिलेवर चेटकीण असल्याचा आरोप करून तिला बेदम मारहाण केली. एवढंच नव्हे तर तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न देखील केला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, न्याय देण्याऐवजी पोलिसांनी आशीर्वाद घेण्यास सुरूवात केली होती.
हे ही वाचा : नालासोपारा: तरुणाची गरबा खेळणाऱ्या मुलींबाबत अभद्र टिप्पणी, आरोपी अटकेत
घटनेदरम्यान आरोपींकडून महिलेची साडी ओढण्याचा प्रयत्न
नंतर या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात आरोप केला की, बास्की राम, बोरी राम, बिजली राम आणि बबलू राम या गावातील गुंडांनी महिलेनं चेटकीण असल्याचं सांगितलं आणि हल्ला केला. या घटनेदरम्यान आरोपींनी त्यांची साडी ओढण्याचा प्रयत्न केला होता. एतकेच नाही,तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. यानंतर, पीडितेनं न्याय आणि संरक्षणाची मागणी करत शाहकुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांची संशयास्पद आणि बेजबाबदार वृत्ती. पोलीस ठाण्याचे काही पोलीस अधिकारी जेव्हा घटनास्थळी पोहोचले असता, हे प्रकरण गांभीर्याने घेण्याऐवजी विचित्र भूमिका घेतली होती. पोलिसांनी महिलेचा आशीर्वाद घेतला होता. एवढंच नव्हे, तर उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी तिचा आशीर्वाद घेण्यास सांगितलं.
हे ही वाचा : Astrology : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशींचे भाग्य उजळणार, नवपंचम योग पैशांचा पाऊस पाडेल
पीडितेकडून न्यायाची प्रतिक्षा
या घटनेनं प्रशासनाची संवेदनशीलता आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. महिलेवर जेव्हा असे गंभीर आरोप किंवा छळ होतो तेव्हा तिच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न ऐरणीवर येतो. अशा परिस्थितीत पोलिसांनी आरोपींना धडा शिकवणे गरजेचे असते. पीडितेनं पोलिसांकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच पोलिसांनी प्रकरणात लक्ष घालून निष्पक्षपणे चौकशी करण्याची मागणी केली.
