72 तास कुणालच्या कुत्र्यानं घरी काय केलं? आजोबा पोहोचताच धावत आला आणि...

मुंबई तक

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन सदस्यांच्या मृत्यूनंतर तब्बल तीन दिवस घरात अडकलेल्या 'शेरू' नावाच्या श्वानाला अखेर सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले. आजोबांना पाहताच शेरू अत्यंत भावुक झाला. सध्या त्याला महापालिकेच्या शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले असून, त्याला दत्तक घेण्यासाठी प्राणीप्रेमी कुटुंबांना आवाहन करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

Google CTA

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case : छत्रपती संभाजीनगरमधील एका हृदयद्रावक घटनेने सर्वांचे डोळे पाणावले आहेत. काही दिवसांपूर्वी खवड्या डोंगरावर आत्महत्या करत असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झालाय. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या मुलाच्या आईनेही आत्महत्या केली. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, त्यांचा पाळीव कुत्रा 'शेरू' तब्बल तीन दिवस घरातच एकटा राहिला होता.

हेही वाचा : जालन्यात झोका खेळताना पाचवीच्या मुलाला लागला फास, हृदयद्रावक घटनेत मृत्यू

शेरूला पाहून नागरिकांचे डोळे पाणावले 

कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर घराला कुलूप होते आणि शेरू आतच अडकून पडला होता. या तीन दिवसांत तो केवळ आपल्या मालकांच्या परतण्याची वाट पाहत होता. दारापाशी कोणाचीही चाहूल लागली की तो आशेने तिथे धावत जात असे. शेवटी, जेव्हा शेरूचे आजोबा तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना पाहून शेरू अत्यंत भावुक झाला आणि त्यांच्या अंगावर धावून गेला. हा अत्यंत संवेदनशील आणि मन हेलावून टाकणारा क्षण पाहून उपस्थित सर्व नागरिकांचे डोळे पाणावले.

हेही वाचा : 30 वर्षीय गर्भवती महिलेवर भावासह काकाकडून अत्याचार, प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ केले रेकॉर्ड