30 वर्षीय गर्भवती महिलेवर भावासह काकाकडून अत्याचार, प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ केले रेकॉर्ड
Women Sexually Assaulted : 30 वर्षीय गर्भवती महिलेनं आरोप केला की, तीन भाऊ आणि काकाने तिच्यासोबत सातत्याने लैंगिक अत्याचार केला, नंतर बेदम मारहाण देखील केली होती. तसेच तिच्या प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गर्भवती पीडितेवर लैंगिक अत्याचार
पीडित महिलेकडून 20 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल
Women Sexually Assaulted : गुजराच्या बनासकांठा जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. संबंधित प्रकरणात महिलेनं चार कथित आरोपी विरोधात धक्कादायक आरोप केलेत. 30 वर्षीय गर्भवती महिलेनं आरोप केला की, तीन भाऊ आणि काकाने तिच्यासोबत सातत्याने लैंगिक अत्याचार केला, नंतर बेदम मारहाण देखील केली होती. तसेच तिच्या प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात आले. महिलेच्या माहितीनुसार, आरोपीने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला होता.
हे ही वाचा : जुन्या वर्गमित्राकडून छळ, फोटो व्हायरलची धमकी.., शेवटी भयंकर घडलं!
पीडित महिलेकडून 20 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल
या प्रकरणात पीडित महिलेकडून 20 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपी अख्तर फकीर, त्याचा भाऊ आरिफ आणि इलियाससोबत त्याचे काका सलीमशाह जुमाशाह फकीर विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गर्भवती पीडितेवर लैंगिक अत्याचार
एफआरआय नुसार, महिला पाच महिन्यांपासून गर्भवती होती आणि मागील काही महिन्यांपासून पीडितेवर लैंगिक अत्याचार आणि शरीरावर हल्ला करण्यात आला. महिलेनं आरोप केला की, अख्तर हा तिच्यापासून विभक्त राहणाऱ्या नवऱ्याचाच मित्र होता. त्याने पीडितेशी संपर्क केला आणि सांगितलं की, दादा स्वास्थ संबंधीत समस्येला घेऊन उपचार केले जातील. अख्तर महिलेच्या अगदीच जवळ आला आणि त्याने अधिक संपर्क वाढवला.
काय घडलं?
महिलेनं पोलिसांना सांगितलं की, यापूर्वी आरोपी अख्तर आणि नातेवाईकांनी पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. एप्रिल महिन्या पलनपुर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या प्रकरणात अख्तरसह तीन लोकांना अटक करण्यात आली. महिलेच्या माहितीनुसार, फरार असलेल्या आरिफ आणि इलियासने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती, नंतर मुलींचे अपहरण करण्याची धमकी दिली.
