जुन्या वर्गमित्राकडून छळ, फोटो व्हायरलची धमकी.., शेवटी भयंकर घडलं!
Crime News : मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका माजी विद्यार्थ्याने तरुणीचा छळ आणि ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप करण्यात आलाय. याच त्रासाला कंटाळून 22 वर्षीय तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं, दरम्यान सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
व्हॅट्सअॅपवर फोटो आणि व्हिडिओचा वापर करत ब्लॅकमेल
अभिषेकवर गुन्हा दाखल
Crime News : बंगळुरूत मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका माजी विद्यार्थ्याने तरुणीचा छळ आणि ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप करण्यात आलाय. याच त्रासाला कंटाळून 22 वर्षीय तरुणीनं तलावात उडी मारत जीवन संपवल्याचा गंभीर प्रकार आहे. आत्महत्या केलेल्या तरूणीची वाणी अशी ओळख समोर आली आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे.
हे ही वाचा : कुणाल चांदगुडेच्या मावशीचा संताप, सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून केली 'ती' विनंती
व्हॅट्सअॅपवर फोटो आणि व्हिडिओचा वापर करत ब्लॅकमेल
संबंधित प्रकरणात आत्महत्येपूर्वी वाणीने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्या सुसाईड नोटमध्ये अभिषेकने व्हॅट्सअॅपवर फोटो आणि व्हिडिओचा वापर करत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ते दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. या प्रकरणी वाणीची बहीण पूजाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अभिषेकवर गुन्हा दाखल
या घटनेत बहीण पूजाने दाखल केलेल्या एकूण तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. अभिषेकवर भारतीय न्याय संहिता कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिच्या कथित पत्रात वाणीने दावा केला की, तिला वारंवार फोन आणि मेसेज करून त्रास दिला. पुढे तिने असं त्यात नमूद केलं की, तिने कथित आरोपीला भेटण्यास नकार दिल्यास तो तिच्या कुटुंबाची अब्रू घालवण्याची धमकी देत होता, तिला अलीकडे या समस्येला अधिक सामोरे जावे लागले.
अशातच वाणीने चिंता व्यक्त करत कुटुंबाच्या प्रतिष्ठेबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, अभिषेकला शिक्षा व्हावी असे आवाहन केले जात आहे. दरम्यान, ही चिठ्ठी ती पीजी म्हणून राहत असलेल्या एका खोलीत आढळून आली. हिच चिठ्ठी रूममेटला सापडल्याने ती चिठ्ठी पूजाला देण्यात आली.
