Astrology : शनी आणि मंगळाची युती, सप्टेंबरपासून 'या' राशींचा कठीण काळ

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची चाल आपल्या जीवनात एक बदल घेऊन येणारी आहे. जेव्हा शनि आणि मंगळ ग्रहाचा विषय येतो तेव्हा ही हालचाल अधिकच तीव्र होते. मंगळ ग्रह हा अग्नी, धैर्य आणि उर्जेचे प्रतीक आहे, तर शनी ग्रह हा संयमी, न्याय आणि कर्माच्या फळांचे प्रतिनिधित्व करू लागतो, जाणून घ्या राशीचे आजचे भविष्य.

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची चाल आपल्या जीवनात एक बदल घेऊन येणारी आहे. जेव्हा शनि आणि मंगळ ग्रहाचा विषय येतो तेव्हा ही हालचाल अधिकच तीव्र होते. मंगळ ग्रह हा अग्नी, धैर्य आणि उर्जेचे प्रतीक आहे, तर शनी ग्रह हा संयमी, न्याय आणि कर्माच्या फळांचे प्रतिनिधित्व करू लागतो. परस्परविरोधी स्वभावाचे दोन ग्रह एकमेकांसमोर येतात, तेव्हा खगोलीय क्षेत्रात एक तणाव निर्माण होतो. 
 

Astrology

2/5

द्रिक पंचांगातील गुणनेनुसार, 1 सप्टेंबर 2026 पासून मंगळ ग्रह आणि शनी एकमेकांशी 90 अंशाचा कोण निर्माण होतो. ज्यामुळे केंद्र योग निर्माण होईल. दोन क्रूर आणि आक्रमक ग्रहांची स्थिती ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून अत्यंत संवेदनशील मानली जाते. याच काळात लष्कर, पोलीस राजकारण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांना मोठे यश मिळू शकते, परंतु सामान्य लोकांनी सावधानता बाळगावी. 

Astrology

3/5

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी संयम बाळगावा लागेल. आपण कठोर परिश्रम कराल, परंतु त्याचे परिणाम दिसण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. घाईचा निर्णय अधिक समस्यांना कारणीभूत ठरण्याची अधिकची शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी हा केंद्र योग अनावश्यक चिंता आणि मानसिक तणाव निर्माण करू शकतोच, कधीकधी जवळजवळ पूर्ण झालेली कामे अंतिम क्षणी अडकण्याची दाट शक्यता आहे. नवीन सौदे किंवा मोठे आर्थिक करार काही दिवसांसाठी पुढे ढकलणे शहाणपणाचे ठरेल. या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. 
 

Astrology

5/5

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी मीन आणि मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे नातेसंबंधात चढ-उतार अनुभवण्यास मिळेल. भागीदारीत काम करणाऱ्यांमध्ये गैसमज वाढण्याची अधिकची शक्यता आहे. निष्काळजीपणामुळे आर्थिक नुकसान होईल. विचार न करता कोणत्याही कागदपत्रांवर सही करणे टाळावे, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे स्वच्छ ठेवावे.