कुणाल चांदगुडेच्या मावशीचा संताप, सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून केली 'ती' विनंती

मुंबई तक

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेनं महाराष्ट्र पूरता हादरून गेला आहे. या प्रकरणी आता घटनेला नवीन वळण मिळत आहे, संबंधित प्रकरणात कुणाल चांदगुडेच्या आईने प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

कुणाल चांदगुडेसह कुटुंबाच्या मृत्यूनंतर मावशीची प्रतिक्रिया 

point

'खोट्या अफवा पसरवल्या जाऊ नयेत'

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेनं महाराष्ट्र पूरता हादरून गेला आहे. एकुलत्या एक मुलाला वाचवताना बापाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर आईने हे चित्र पाहून जीवन संपवलं. अवघ्या काही क्षणातच चांदगुडे कुटुंबाने जगाचा निरोप घेतला. अशातच चांदगुडे प्रकरणावरून सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. अशातच कुणालच्या मावशीचा व्हिडिओ समोर आला आहे, त्यात ती संतापलेली दिसून येत आहे.

हे ही वाचा :  Astrology : शनी आणि मंगळाची युती, सप्टेंबरपासून 'या' राशींचा कठीण काळ

कुणाल चांदगुडेसह कुटुंबाच्या मृत्यूनंतर मावशीची प्रतिक्रिया 

खवड्या डोंगर प्रकरणात संगीता चांदगुडे आणि मुरलीधर चांदगुडे यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर आत्महत्येवरून रान पेटलं आहे. यावर आता कुणाल चांदगेडे याची मावशी पल्लवी पाटीलने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत या सर्व खोट्या अफवा असल्याचं सांगितलं, यावर विश्वास ठेवू नका असं सांगितलं. संगीता ही मोठी बहीण असून, त्यांना कुणाला आणि माझ्या मेहुण्याला गमावल्यानंतर आमची परिस्थिती काय आहे हे आम्हालाच माहिती आहे, 

'खोट्या अफवा पसरवल्या जाऊ नयेत'

कुणाला मोबाईल न मिळाल्याने त्याने जीवन संपवलं अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. मात्र, सत्य परिस्थिती ठाऊक नसतानाही अशा खोट्या अफवा पसरवल्या जाऊ नयेत, अशी विनंती त्यांनी केली. माझ्या बहिणीची, मेव्हण्याची आणि मुलाची राख सावडून घरी जातेय. घरी गेल्यानंतर मोबाईल पाहिल्यानंतर एकामागून एक व्हिडिओ समोर येताना दिसताहेत, असं म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या. 

हे ही वाचा :  Maharashtra Weather : राज्यात पावसाचा यु टर्न, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

त्याचदरम्यान, पुढे म्हणाल्या की, आई वडिलांचं वय सध्या 75 वर्षे आहे. त्यांनी आपल्या एका मुलाला गमावलं आहे. त्यामुळे हा धक्का त्यांना सहन होणारा नाहीये, असं पल्लवी पाटील यांनी सांगितलं. कुणाल आणि संगिताबाबतची खरी माहिती न मिळताच कोणीही काहीही व्हिडिओ बनवून आरोप करू नये, अशी मावशी संगीता म्हणाली.