गर्लफ्रेंडने कारवर 3,400 वेळा केले किस, Video व्हायरल
Viral News : सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतो. एका तरुणाने कारवर तब्बल 3400 किसींग केल्याची घटना आहे. याचा व्हिडिओ सर्वत्र तुफान व्हायरल होताना दिसतोय. हे प्रकरण ट्राफिक पोलिसांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
साडे तीन तासांत कारला 3,400 वेळा किसींग
व्हिडिओ तुफान व्हायरल
Viral News : सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतो. एका तरुणाच्या कारवर गर्लफ्रेंडने तब्बल 3400 किस केल्याची घटना आहे. याचा व्हिडिओ सर्वत्र तुफान व्हायरल होताना दिसतोय. हे प्रकरण ट्राफिक पोलिसांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. ही घटना मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील आहे. पोलिसांनी तरुणाला पकडून 5,500 रुपयांचे चलान कापले.
हे ही वाचा : पीडितेला जंगलात नेत जिप्सीला बांधून केले अत्याचार, घरी परतल्यानंतर सांगितला घटनाक्रम
पोलिसांच्या माहितीनुसार, इंस्टाग्रामवर ट्रेंड सेट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आल्याचं बोललं जातंय. गर्लफ्रेंडने परदेशातील ट्रेंडला प्रभावित होऊन कारच्या संपूर्ण बॉडीवर लिपस्टिकने किस केल्याचं दिसून येतंय. यासाठी तरुणाने तब्बल तीन तास लागले होते. नंतर हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आणि व्हायरल झाला होता. एकाच दिवसांत 55 लाख व्ह्यूजपर्यंत पोहोचला.
व्हिडिओ तुफान व्हायरल
साडे तीन तासांत कारला 3,400 वेळा किस
गर्लफ्रेंडने साडे तीन तासांत कारला 3,400 वेळा किस केल्याचं बोललं जातंय. यासाठी एक लिपस्टीक संपवण्यात आली होती. यानंतर, आदित्य सिटी सेंटरमधून आपली कार वेगाने चालवत थाटीपूर परिसराच्या दिशेने निघून गेला. दरम्यान, पोलीस कारवाईनंतर तरुणाने आपली चूक मान्य केली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहोत याची त्याला कल्पना नव्हती.
हे ही वाचा : पालघरच्या आश्रमशाळेत सात वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 26 विद्यार्थांना ताप, खोकला अन् सर्दी
संबंधित व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. याला एक वेगळाच विक्रम म्हणता येईल. कारच्या काचेला पूर्णपणे काळी फिल्म लावण्यात आली होती. पोलिसांच्या कारवाईनंतर आदित्य काही तासांपासून कपड्याने कारवरील किसचे डाग साफ केले. यानंतर पोलिसांनी तिथून जाण्यास सांगितले होते.
