गोळी लागली नाही, तरीही टायगरचा हात का भाजला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं...

मुंबईतील जुहू परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत टायगर श्रॉफचा उजवा हात भाजला आहे. घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेत्याची भेट घेतल्यानंतर दिली. त्याच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारवर पाच राऊंड फायर करण्यात आले, ज्यामध्ये त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाले.

ADVERTISEMENT

Tiger Shroff Firing
Tiger Shroff Firing
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

टायगर श्रॉफवर गोळीबार

point

एकनाथ शिंदेंनी घेतली भेट

point

नेमकं काय घडलं?

Tiger Shroff Firing : मुंबईतील जुहू परिसरात रविवारी (18 ऑक्टोबर) संध्याकाळी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारवर अज्ञातांनी पाच राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टायगर श्रॉफ हा फुटबॉल सामना खेळून निघाला होता. या हल्ल्यात तो थोडक्यात बचावला असला, तरी गोळीबारादरम्यान टायगरचा ड्रायव्हर फिरदौस आणि एक रिक्षाचालक जखमी झाले आहेत. याशिवाय, गन पावडरमुळे टायगरचा उजवा हात भाजल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि कुटुंबाला सुरक्षेचे आश्वासन दिले.

लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी

या गंभीर घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी फोनवर चर्चा करून तातडीने तपास करण्याचे, हल्लेखोरांना जेरबंद करण्याचे आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या परदेशात लपून बसलेले गुंड अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे घेतल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा :  अब्दुल सत्तार, संजना जाधव आणि राहुल पाटील यांनी बंडखोरी का केली?

गोळीबार झाल्यानंतर काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, जुन्या पल्सर बाईकवर आलेल्या तीन जणांपैकी दोघांनी गोळीबार केला तर तिसरा साथीदार पळून जाण्यासाठी गाडी सुरू ठेवून बाहेर उभा होता. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या बाजूला गोळीबार केला असून, ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगर श्रॉफने स्वतः गाडी चालवून रुग्णालयापर्यंत नेल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा : अभिनेता टायगर श्राॅफवर जुहूत गोळीबार, घटनेनं परिसर हादरला

'गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा निषेध करत मुंबईत पुन्हा कोणत्याही प्रकारची गुंडगिरी किंवा गँगवॉर खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम भरला आहे. 1990 च्या दशकाप्रमाणेच मुंबईतील गँगवॉर संपवण्यात आले होते आणि आताही कुणालाही कायद्याशी खेळू दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सेलिब्रिटींना किंवा नागरिकांना कुठल्याही धमक्या आल्यास त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले असून राज्य सरकार आणि मुंबई पोलीस सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींच्या सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले.