पालघरच्या आश्रमशाळेत सात वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 26 विद्यार्थांना ताप, खोकला अन् सर्दी

मुंबई तक

Palghar News : गडचिरोलीनंतर आता पालघरमध्ये मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आलेला आहे. पालघर जिल्ह्यातील मासवण आश्रमशाळेतील सात वर्षीय विद्यार्थ्यांचा उपचारासाठी नेत दुर्दैवी मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Palghar news  (AI Photo)
Palghar news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आश्रामशाळेत प्रकृती बिघडून सात वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

point

श्रीयांशच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय? 

Palghar News : मोहम्मद हुसेन खान - गडचिरोलीनंतर आता पालघरमध्ये मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आलेला आहे. पालघर जिल्ह्यातील मासवण आश्रमशाळेतील सात वर्षीय विद्यार्थ्यांचा उपचारासाठी नेत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेनं आता आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. 

हे ही वाचा : Astrology : ग्रहस्थितीत मोठा बदल, 2 सप्टेंबरपर्यंत 'या' राशींनी सावध राहावे

आश्रामशाळेत प्रकृती बिघडून सात वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

दरम्यान, मासवण येथील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीत शिक्षण घेणाऱ्या श्रीयांश शैलेश आंबात याचा 24 ऑगस्ट रोजी अचानक प्रकृती बिघडून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीयांशला 22 ऑगस्ट रोजी ताप आला होता. तेव्हा त्याला उपचारासाठी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. 

उपचार घेतल्यानंतर श्रीयांशची प्रकृती सुधारली गेल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवस क्लासेस देखील अटेंड केले आणि इतर विद्यार्थ्यांसोबत खेळत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मात्र, 24 ऑगस्ट रोजी अचानक त्याची प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला तातडीने मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

हे ही वाचा : आदिवासी तरुणीने 'छात्रो की गूंज'मध्ये आवाज उठवला, आता राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र

श्रीयांशच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय? 

श्रीयांशच्या मृत्यूमागील नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूमागील कारण लवकर समोर येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. अशातच याच आश्रमशाळेतील 26 विद्यार्थ्यांना ताप, खोकला आणि सर्दीने आजारी असल्याची माहिती आहे. हे विद्यार्थी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात असून निरीक्षणाखाली आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.