आदिवासी तरुणीने 'छात्रो की गूंज'मध्ये आवाज उठवला, आता राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र

मुंबई तक

Rahul Gandhi Letter to CM Devendra Fadnavis : पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाच्या मुद्यावरुन देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांचे तातडीने समाधान करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

Rahul Gandhi Letter to CM Devendra Fadnavis
Rahul Gandhi Letter to CM Devendra Fadnavis
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आदिवासी तरुणीने 'छात्रो की गूंज'मध्ये आवाज उठवला,

point

आता राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र

Rahul Gandhi Letter to CM Devendra Fadnavis : देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात घेतलेल्या ‘छात्रो की गूंज’ या कार्यक्रमात एका आदिवासी तरुणीने मांडलेल्या प्रश्नांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील मांजरी भागात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू असून, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याची तक्रार या तरुणीने राहुल गांधी यांच्यासमोर केली होती. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाची राहुल गांधी यांनी दखल घेतली असून, आता त्यांनी हा मुद्दा थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

हेही वाचा : घरगुती वाद की आणखी काही? तिघांच्या मृत्यूचं कारण काय? दोन्ही कुटुंबियांचे वेगवेगळे दावे

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा उल्लेख, फडणवीसांना राहुल गांधींचं पत्र  

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा उल्लेख केला आहे. तसेच त्यांनी आदिवासी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांचे समाधान करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्टही केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी दहा दिवसांहून अधिक काळ आपल्या अधिकारांसाठी उपोषण करत असल्याचं म्हटलं आहे. पुण्यातील ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी आपल्या समस्या राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या होत्या.

हेही वाचा : पॉर्न साईटवर टाकले बायकोचे व्हिडीओ, चार वर्षांच्या मुलीसमोरच लज्जास्पद कृत्य; पुढं काय घडलं?