रोहित पवारांच्या पीएची मुलगी पार्किंगमध्ये कशी सापडली? सगळी स्टोरी मुंबई Tak वर
Pune Metro : आमदार रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीचा बारामतीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर तिचा शोध सुरू होता; मात्र दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बारामतीत बेपत्ता मुलीचा मृत्यू
सीसीटीव्ही फुटेजमधून हालचालींचा मागोवा
Pune Metro : बारामतीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी शनिवारी रात्री आईच्या मोबाईलवरून एका मित्रासोबत मुलगी चॅट करत होती. या चॅटमधील काही गोष्टी आईच्या लक्षात आल्यानंतर दोघींमध्ये घरात वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात मुलगी घरातून बाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा सोसायटी परिसरात आणि मित्र-मैत्रिणींकडे शोध सुरू केला. ज्या व्यक्तीसोबत ती चॅट करत होती, त्याच्याशीही संपर्क करण्यात आला; मात्र तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
हेही वाचा : चंद्रपूर : कोर्टाबाहेर भरदिवसा फायरिंग, डोक्यात गोळ्या झाडून तरुणाची हत्या; कारण काय?
मुलगी बिल्डिंगच्या बाजूला एक मुलगी मृतावस्थेत पडल्याची माहिती
रात्री बराच वेळ शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. त्यानंतर पोलिसांकडे मिसिंगची तक्रार करण्यात आली. तिचे अपहरण झाले असावे, असा संशयही कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी तक्रार नोंदवून तिचा शोध सुरू केला. मात्र रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास स्वामी समर्थ बिल्डिंगच्या बाजूला एक मुलगी मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना 112 क्रमांकावरून मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृत मुलगी ही रोहित पवार यांच्या पीएची मुलगी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आणि फॉरेन्सिक टीमसह संबंधित पथकांनी तपास सुरू केला.
हेही वाचा : भारताच्या तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? Niti आयोगाचे धक्कादायक आकडे बघाच!
