भारताच्या तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? Niti आयोगाचे धक्कादायक आकडे बघाच!
भारताकडे जगातील सर्वात मोठ्या तरुण लोकसंख्येपैकी एक असताना रोजगाराच्या संधी आणि तरुणांचं कौशल्य यांच्यात एवढी मोठी दरी का निर्माण झाली आहे? नीती आयोगाच्या अहवालातून अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. 14 कोटी पदवीधर, 9 कोटी NEET तरुण, अपुरं कौशल्य आणि सरकारी नोकऱ्यांसाठीची प्रचंड स्पर्धा यामागचं संपूर्ण गणित जाणून घ्या.
ADVERTISEMENT

मुंबई: भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. देशातील तरुणांची सरासरी वयोमर्यादा अवघं 28 वर्षे आहे. त्यामुळे दरवर्षी जवळपास 1 कोटी तरुण Working Age Population मध्ये दाखल होतात. ही तरुण लोकसंख्या भारताची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. पण याच तरुणांना योग्य शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या नाहीत, तर हीच लोकसंख्या देशासमोरचं मोठं आव्हान आणि मोठी समस्या देखील ठरू शकतं. आणि याच वास्तवावर नीती आयोगाच्या जवळपास 100 पानी अहवालाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
“Reimagining Skilling for Viksit Bharat @ 2047” या अहवालातून भारताच्या शिक्षणव्यवस्थेत आणि Skill Development System मध्ये किती मोठी दरी आहे, हे समोर आलं आहे.
भारतात Graduate भरपूर, पण योग्य नोकरी किती?
भारतात सध्या जवळपास 14 कोटी पदवीधर आहेत. दरवर्षी आणखी सुमारे 50 लाख विद्यार्थी हे पदवीधर होतात. पण धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी केवळ 8.25 टक्के पदवीधरांनाच त्यांच्या शैक्षणिक पात्रतेला साजेशा नोकऱ्या मिळतात.
म्हणजे जवळपास 92 टक्के पदवीधवर आपल्या पदवीच्या शिक्षणाशी संबंधित कामच करत नाहीत, एक तर ते बेरोजगार आहेत किंवा अनियमित मजूर (Casual Labour) म्हणून काम करत आहेत. याचा अर्थ भारतात पदवी मिळतेय, पण त्या पदवीचं रोजगाराच्या बाजारातील मूल्य अपेक्षेइतकं नाही.म्हणून समस्या केवळ बेरोजगारीची नाही तर, शिक्षण आणि रोजगार यांच्यातील तफावतीबद्दल आहे.
