नवऱ्यासह सासूने सुनेला टॉयलेट क्लीनर पाजलं, उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
म : महिलेला नवऱ्याने आणि सासूने मिळून टॉयलेट क्लीनर पाजलं, ज्यात तिचा दुर्दैवी अंत झाला. गंभीर परिस्थिती महिलेला फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी अंत झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवऱ्यासह सासूने सुनेला टॉयलेट क्लीनर पाजलं
नवरा, सासू सहा वर्षांच्या मुलीला घेऊन फरार
Crime News : महिलेला नवऱ्याने आणि सासूने मिळून टॉयलेट क्लीनर पाजलं, ज्यात तिचा दुर्दैवी अंत झाला. गंभीर परिस्थिती महिलेला फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी अंत झाला. शवविच्छेदनानंतर महिलेचा मृतदेह हा नातेवाईकांकडे सोपवण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी नवरा आणि सासू विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत. ही घटना पंजाबच्या जालंधर येथील कस्बा करतारपुर येथील आहे.
हे ही वाचा : जालन्यात झोका खेळताना पाचवीच्या मुलाला लागला फास, हृदयद्रावक घटनेत मृत्यू
नवऱ्यासह सासूने सुनेला टॉयलेट क्लीनर पाजून संपवलं
मृत महिलेची नेहा अशी ओळख समोर आली आहे. नवऱ्यासह सासूने मिळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर पीडित नेहाची परिस्थिती अगदीच गंभीर होऊन बसली होती. नेहाला फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नवरा, सासू सहा वर्षांच्या मुलीला घेऊन फरार
महिलेच्या कुटुंबीयानी तक्रारीच्या आधारावर पोलिसांन नवरा आणि सासू विरोधात तक्रार दाखल केली. महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर नवरा, सासू सहा वर्षांच्या मुलीला घेऊन फरार झाले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा तपास करण्यास सुरूवात करत छापा टाकला. पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, महिलेचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांकडे मृतदेह देण्यात आला. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपाविरोधात कारवाईची मागणी केली. महिलेनं जजसमोर लिखित स्वरुपात दावा केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
