मुंबईची खबर : BMC चे 'पादचारी प्रथम' अभियान किती यशस्वी? आयुक्तांनी थेट आकडेवारीच सांगितली

बीएमसीने पादचारी प्रथम या मोहिमेअंतर्गत फुटपाथवरील अतिक्रमणांविरोधात जोरदार मोहीम राबवली. यामध्ये 399 पदपथांवरील अतिक्रमणे यशस्वीपणे हटवण्यात आली आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पादचारी प्रथम अभियान

point

बीएमसीची अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई

Mumbai News : मुंबईत पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि अडथळाविरहित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी BMC ने ‘पादचारी प्रथम’ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील 26 प्रशासकीय विभागांतील 399 पदपथांवरील अतिक्रमणे यशस्वीपणे हटविण्यात आली आहेत. या कारवाईमुळे तब्बल 500 किलोमीटर लांबीचे रस्ते पादचाऱ्यांसाठी खुले झाले आहेत. आतापर्यंत 2,803 अतिक्रमणे आणि फेरीवाले हटवण्यात आले आहेत. प्रामुख्याने रुग्णालये, शाळा-महाविद्यालये, रेल्वे व बस स्थानक परिसरासह विविध सार्वजनिक ठिकाणांचा या मोहिमेत समावेश असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिली आहे.

52 हजार 448 बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टर्स हटवले

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत 2,803 अतिक्रमणे आणि फेरीवाले हटवण्यात आले आहेत. प्रामुख्याने रुग्णालये, शाळा-महाविद्यालये, रेल्वे व बस स्थानक परिसरासह विविध सार्वजनिक ठिकाणांचा या मोहिमेत समावेश आहे. BMC ने पादचाऱ्यांच्या सुविधेसोबतच शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक लावण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी एक व्यापक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील काही दिवसांत तब्बल 52 हजार 448 बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टर्स हटवण्यात आले आहेत.

हे ही वाचा : टायगर श्रॉफवर गोळ्या झाडणारे तिघे 15 मिनिटात कसे सापडले?, पोलिसांनी दिल्ली धक्कादायक माहिती

अनधिकृत जाहिरात साहित्य जप्त

याशिवाय, 8 ते 16 ऑक्टोबर 2026 या नऊ दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत संपूर्ण मुंबईतून 3,537 अनधिकृत जाहिरात साहित्य जप्त करण्यात आले आहे. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे पादचाऱ्यांचा प्रवास सुकर होण्यासोबतच मुंबईचे सौंदर्य टिकवून ठेवण्यास मोठी मदत होत आहे.

हे ही वाचा : टायगर श्रॉफवर गोळीबार, 15 तासांत शुटर कोटा येथे कसे पोहोचले?

फुटपाथवर सुरक्षित चालणे हा मूलभूत हक्क

फुटपाथवर सुरक्षितपणे चालणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जून 2026 मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात स्पष्ट केले आहे. हा अधिकार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 म्हणजेच जीवनाचा अधिकार आणि अनुच्छेद 19 म्हणजेच मुक्तपणे फिरण्याचा अधिकार यांच्या अंतर्गत येतो. रस्त्यांवर वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या सुरक्षेला व हक्कांना प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक असून, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित फुटपाथ उपलब्ध करून देणे हे स्थानिक प्रशासनाचे कायदेशीर कर्तव्य आहे.